मोगरा खंडोबाची दोन दिवसीय यात्रा रद्द, कोरोनामुळे घेतला निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील मोगरलिंग असलेल्या श्री. खंडोबा देवाची दोन दिवसांची यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे.

माजलगाव (जि.बीड) : तालुक्यातील मोगरा येथील मोगरलिंग असलेल्या श्री. खंडोबा देवाची दोन दिवसांची यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रभाव वाढु नये यासाठी यात्रोत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती मंदिराचे पुजारी शिवराज भरडे यांनी दिली आहे. मोगरा येथे दरवर्षी चंपाषष्ठीला मागरलिंग खंडोबाचा मोठा यात्रोत्सव होता. तालुका परिसरातील अनेक गावातील भाविकांची याठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी असते.

यात्रेसाठी राज्यातून मुंबई, ठाणे, पुणे औरंगाबाद या शहरातून भाविक येतात. यात्रेत पहिल्या दिवशी छबिना व गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो तर दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रमाने यात्रोत्सवाची सांगता होते. यावर्षी चंपाषष्ठीला होत असलेली मोगरा येथील खंडोबा यात्रा प्रशासनाच्या सूचनेवरून कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन पुजारी शिवराज भरडे यांनी केले आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Days Mogara Khandoba Fair Majalgaon Beed News