हिंगाेली : अपघातात दोघांचा मृत्‍यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

औंढा नागनाथ तालुक्‍यातील शिरडशहापूर येथे असलेल्या भवानी माळाजवळ रविवारी (ता. 3) चारचाकी व दुचाकीच्या अपघात एकाचा जागीच मृत्‍यू झाला तर एका गंभीर जखमीचा औंढा नागनाथ येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी मृत्‍यू झाल्याची घटना घडली.  

शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्‍यातील शिरडशहापूर येथे असलेल्या भवानी माळाजवळ रविवारी (ता. 3) चारचाकी व दुचाकीच्या अपघात एकाचा जागीच मृत्‍यू झाला तर एका गंभीर जखमीचा औंढा नागनाथ येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी मृत्‍यू झाल्याची घटना घडली.  

या बाबत अधिक माहिती अशी की, शिरडशहापूर येथून हैदराबाद ते औरंगाबाद जाणाऱ्या राष्‍ट्रीय महामार्गावरून काशीनाथ गोरे व गजानन वंजे दोघेही (रा. औंढा नागनाथ) हे दोघेजण दुचाकी क्रमांक एमएच 38 एल 1368 ने औंढा नागनाथकडे जात होते याच वेळी औंढा नागनाथकडून चारचाकी क्रमांक एमएच 20 ईवाय 2180 ही या मार्गावरून नांदेडकडे जात होती. 

रविवारी रात्री आठ ते साठेआठच्या सुमारास ही दोन्ही वाहने शिरडशहापूर जवळ असलेल्या भवानी माळाजवळ समोरासमोर धडकल्याने या दोन वाहनांचा अपघात झाला यात काशीनाथ गोरे (वय 32) हा जागीच ठार झाला तर गजानन वंजे हा गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच बीट जमादार प्रकाश नेव्हल यांनी घटनास्‍थळी भेट देवून जखमीला औंढा नागनाथ येथील रुग्णांलयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गजानन वंजे (वय 35) यांचा उपचार सुरू असताना सोमवारी मृत्‍यू झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सोमवारी दुपारपर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two die in accident near Shirdhashpur