grand-son.jpg
grand-son.jpg

वीज अंगावर पडून आजोबा- नातवाचा मृत्यू

मरखेल (नांदेड) : परतीच्या पावसाने अक्षरशः परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून थैमान घातले आहे. या भागातील शेतकरी, कष्टकरी हाताला आलेली पिके घरात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. असाच प्रयत्न करणाऱ्या आजोबा व त्यांच्यासोबत असलेल्या नातवावर निसर्गाने घाला घातल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास टाकळी (जहांगीर) येथे घडली. शेतातील सोयाबीनची रास करणाऱ्या दोघांवर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

यातील चंदररेड्डी इररेड्डी बोप्पावाड (वय ६०) व त्यांचा नातू योगेश गोपाळरेड्डी बोप्पावाड हे दोघे (रा. टाकळी जहांगीर) शुक्रवारी रोजी दुपारी स्वतःच्या शेतातील सोयाबीन पिकांची रास करण्यासाठी शेताकडे गेले होते. मरखेल व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा उपद्रव शुक्रवारीदेखील दिसून आला.

सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह या भागात जोरदार वादळी पाऊस झाला. यावेळी शेतात थांबलेल्या उपरोक्त दोघांवर सायंकाळी सातच्या सुमारास अंगावर वीज कोसळल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com