coronavirus - कोरोनाशी लढ्यात हलगर्जीपणा भोवला, बीडमध्ये दोघे निलंबित

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

बीड जिल्ह्यातील प्रशासन कोरोना विरुद्धचा लढा नियोजनबद्धरीत्या लढत असताना कामात कुचराई केल्याबद्दल दोन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हो दोन्ही तलाठी परळी तालुक्यातील आहेत.

बीड -  कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी महसूल, पोलिस, आरोग्य, ग्रामविकास आदी विविध प्रशासनांनी हातात हात घेऊन समन्वयाने राबविलेला बीड पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक ठरत असताना सूचनांकडे दुर्लक्ष व कर्तव्यात कसूर करणारेही काही महाभाग आहेत. अशाच दोन तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. निलंबित दोघेही तलाठी परळी तालुक्यातील आहेत.

नागपिंप्री सजाचे तलाठी मोतीराम गुंडेराव जिलेवाड व पिंपळगाव गाढे सजाचे तलाठी सचिन सुधीर एरंडे या दोघांवर कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली. कोरोनासारख्या आपत्तीचे निवारण करण्यासाठी सर्व विभाग जीव ओतून काम करीत असताना हे महाभाग मात्र कामात सजावर गैरहजर आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two employees suspended in Beed district