मराठवाड्यात दोन शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

बीड, परभणी - रुद्रापूर (ता. बीड) येथील शेतकरी पांडुरंग रामभाऊ नागरगोजे (वय 50) यांनी शुक्रवारी (ता. 19) सकाळी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नापिकीमुळे बॅंकांचे सुमारे सव्वा लाख रुपये कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. नापिकी, बॅंकेचे एक लाख सत्तर हजार रुपये कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून आवइ (ता. पूर्णा, जि. परभणी) येथील शेतकरी केशव बळिराम कदम (35) यांनी आज पहाटे घराजवळच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
Web Title: two farmer suicide in marathwada