Kashinath kadam
sakal
अर्धापूर (जिल्हा नांदेड) - अर्धापूर तालुक्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटनेत सातत्याने वाढ होत असून येळेगाव (ता अर्धापूर) येथील तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच शनिवारी (ता २०) येथील एका तरुण शेतकऱ्यांने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याची घटना उघडकीस आली आहे.या शेतकऱ्यांचे नाव काशिनाथ बालाजी कदम (वय २७) यांनी कर्जाळा कंटाळून आत्महत्या केली आहे.या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.