पुराच्या पाण्यात दोन वनरक्षक गेले वाहून

संजय जाधव 
रविवार, 21 जुलै 2019

कन्नड व पिशोर परिसरात शनिवारी रात्री तुफान पाऊस झाला. परिणामी बहुतांशी नदी नाल्याला पूर आला होता. यात सारोळा व जैतखेडा येथे कार्यरत राहुल दामोदर जाधव व अजय संतोष भोई जैतखेड्यातून पिशोर येथे जात असतांना भारंबा तांडा गावाजवळील नाल्याच्या पुरात मोटारसायकलसह वाहून गेले. 

कन्नड :  भारंबा (ता.कन्नड, जि.औरंगाबाद) येथील पुलावरून पुराच्या पाण्यात दोन वनरक्षक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (ता.20) रात्री घडली. 

कन्नड व पिशोर परिसरात शनिवारी रात्री तुफान पाऊस झाला. परिणामी बहुतांशी नदी नाल्याला पूर आला होता .यात सारोळा व जैतखेडा येथे कार्यरत राहुल दामोदर जाधव व अजय संतोष भोई जैतखेड्यातून पिशोर येथे जात असतांना भारंबा तांडा गावाजवळील नाल्याच्या पुरात मोटारसायकलसह वाहून गेले. . 

रविवारी (ता.21) सकाळी ग्रामस्थांना मोटरसायकल दिसून आल्याने घटनेचा शोध सुरू झाला. पुढे जाधव यांच्या मृतदेह आढळून आला, मात्र दुसरे सहकारी भोई यांचा तपास लागला नाही. त्यांचा तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two forests Officers got carried away into the flood water