हिंगोलीत दोनशे किलो प्लास्टिक जप्त ; आठ व्यापाऱ्यांना दंड

राजेश दारव्हेकर 
Friday, 5 February 2021

हिंगोली पालिकेकडून शहरातील दूकानात धाड टाकून दोनशे किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. 

हिंगोली : स्वछ शहर अभियानातंर्गत पालिकेच्या पथकाने शहरातील प्लास्टिक साठवून ठेवणाऱ्या दुकानात धाडी टाकून शुक्रवारी (ता.पाच) जवळपास दोनशे किलो प्लास्टिक जप्त करून आठ व्यापाऱ्याकडून २५ हजार पाचशेचा दंड वसूल केला.

कोरोनामुळे मोहीम थंडावली होती
शहर स्वछ अभियानांतर्गत लॉकडाउनपूर्वी मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, सुमारे एक वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामुळे मोहीम थंडावली होती. पालिकेने रामदास पाटील यांच्या काळात दुकानावर धाडी टाकून पन्नास टनपेक्षा अधिक प्लास्टिक जप्त केले असून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला. मात्र, रामदास पाटील यांची बदली होताच ही मोहीम वर्षभरापासून थंडावली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मनोबल उंचावले होते. त्यातच पुन्हा कोरोना प्रादुर्भाव, लॉकडाउन या बाबीमुळे व्यापाऱ्यांनी प्लास्टिक कॅरीबॅग पिशव्या सर्रासपणे ग्राहकांना देत असतानाही पालिकेने याकडे दुर्लक्ष केले. 

हेही वाचा -  मागील काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे

दुकानदारांची घेतली झाडाझडती 
शुक्रवारी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरुवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्लास्टिक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये दुकानदारांची झाडाझडती घेतली असता जवळपास दोनशे किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. त्यानुसार आठ व्यापाऱ्यांकडून दंडही वसूल केला. 

हेही वाचा - परभणी मेडीकल कॉलेजसाठी जमिन हस्तांतरणाचा मार्ग मोकळा

यांना केला दंड 
यामध्ये केजीएन किराणा दुकान पाच हजार, ओम किराणा पाचशे, भारत गारमेंट मोहम्मद असरद पाच हजार, रामेश्वर मुंदडा किराणा दोन हजार, अमर कलेक्शन कापड दुकान दोन हजार, लाडली ड्रेसेस दोन हजार, सुदर्शन नेनवानी किराणा दुकान पाच हजार, सुनील नेनवाणी किराणा दुकान पाच हजार असा एकूण मिळून आठ दुकानदारांकडून २६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. कारवाईत उमेश हेबांडे, सनोबर तस्लिम, बाळू बांगर, पंडित मस्के,आदींचा पथकात समावेश आहे.  

 
संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two hundred kilos of plastic seized in Hingoli; Eight traders fined hingoli genaral news