दोनशे ८८ जणांना अटक करूनही लातूरात नागरिक रस्त्यावरच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 एप्रिल 2020

लातूर, ता.१५ ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लावलेल्या पहिल्या टाळेबंदीमध्ये लातूर शहर पोलिस उपविभागाने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईच बडगा उगारला होता. यातून दोनशे ८८ जणांना अटकही केली. सुमारे तीन कोटी रुपयांची २३३ वाहनेही जप्त करून ठेवली आहेत. पोलिस सातत्याने कारवाई करीत आहेत. पोलिसांनी काठी उगरल्यानंतरच लातूरकर घरात बसणार का? असा प्रश्न आहे. पोलिसांच्या कारवाईपेक्षा नागरिकांच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. 

लातूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लावलेल्या पहिल्या टाळेबंदीमध्ये लातूर शहर पोलिस उपविभागाने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईच बडगा उगारला होता. यातून दोनशे ८८ जणांना अटकही केली. सुमारे तीन कोटी रुपयांची २३३ वाहनेही जप्त करून ठेवली आहेत. पोलिस सातत्याने कारवाई करीत आहेत. पोलिसांनी काठी उगरल्यानंतरच लातूरकर घरात बसणार का? असा प्रश्न आहे. पोलिसांच्या कारवाईपेक्षा नागरिकांच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. 
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. यात केंद्र शासनाने पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन केला. संचारबंदी लागू केली. ता.१४ एप्रिलपर्यंत हा टाळेबंदी होता. या काळात पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील चार पोलिस ठाण्यांच्या पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर नागरिक फिरू नयेत, याकरिता काळजी घेतली. पहिल्यांदा काठीचा धाक दाखवला तर कधी रस्त्यावर बसवण्याची शिक्षा दिली. तर कधी पोलिस ठाण्याची हवा दिली. ता. २२ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत या चारही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ७९ गुन्हे दाखल केले.

यात दोनशे ८८ जणांना अटकही करण्यात आली. तीन कोटी सात लाख रुपयांची दोनशे ३३ वाहने जप्तही केली. पोलिसांच्या वतीने सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. तरी देखील अनेक नागरिक रस्त्याने फिरताना दिसत आहेत. सध्या टाळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. सुरवातीला पोलिसांनी काठी उगारल्यानंतर लातूरकर घरात बसले होते; पण नंतर थोडी ढील दिल्यानंतर रस्त्यावर येण्याचे प्रकार वाढले आहेत. आता पुन्हा पोलिसांना काठी उगारावी लागत आहे. नागरिकांनी कारवाईला सामोरे न जाता घरात बसूनच कोरोनापासून सुरक्षित राहण्याची गरज आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

लातूर पोलिस उपविभागाने ता.२२ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत केलेली कारवाई. 

ठाणे  ---  दाखल गुन्हे -- अटकेची संख्या  --- जप्त वाहने -----   जप्त वाहनांची किंमत 
गांधी चौक------१२------------------४४ ---------------२३-------------------८५,७०,००० 
शिवाजीनगर----२९-------------------१४१--------------११६--------------१,६३,५०,००० 
विवेकानंद चौक--२२----------------८५-----------------४० ----------------३६,७०,००० 
एमआयडीसी----१६ ---------------१८------------------५४----------------२१,६०,००० 
एकूण--------७९-----------------२८८ ----------------२३३ ---------------३,०७,५०,००० 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Hundred People Arrested For Breaking Laws Latur News