ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोन ठार

crime.jpg
crime.jpg
Updated on

अर्धापूर, (जि. नांदेड) - नांदेड - अर्धापूर रस्त्यावरील वसमतफाटा महामार्ग पोलिस चौकीच्या परिसरात ट्रक - दुचाकीच्या अपघातात दोन जन ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२०) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाली आहे. 

या अपघाताबाबत महामार्ग पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, अर्धापूरकडून छोटू उर्फ संदीप पैठणे (रा. फुलेनगर परळी) दुचाकीवरुन (एम.एच.१९ ए.बी. २५१९) नांदेडकडे जात होते. त्यांच्या सोबत पुजा बाबुराव पवार (वय २६ रा. शिवाजीनगर, पुणे) होत्या. नांदेडकडून वीट वाहतूक करणारा ट्रक (एम.एच.२२ -१६३७) अर्धापूर शहराकडे येत असताना महामार्ग पोलिस चौकी परिसरातील मदरसा समोर दोन्ही वाहणांचा आपघात झाला. यात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. तर दुचाकीस्वाराचा उपचारासाठी रूग्णालयात नेत आसतांना वाटेतच मृत्यू झाला. जखमीस उपचारासाठी हालविण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस निरीक्षक शेख, रहेमान ज्ञानेश्वर कदम, शेख एकबाल, प्रभाकर कडेवाड, रामदास कदम, वामन कोकाटे, राम जाधव, ईर्शाद बेग, श्रीराम कदम, वसंत सिनगारे यांनी पुढाकार घेतला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

जुन्या वादावरुन डोके फोडले
नांदेड ः कंधार तालुक्यातील वहाद येथे एकास जुन्या वादातून डोक्यात दगड मारुन जखमी केल्याची घटना बुधवारी (ता. १८) दुपारी एकच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर नरसिंग मुकनर (वय २७) हा तरुण जेवण करण्यासाठी घराकडे जात असताना गावातील आरोपींनी जुन्या वादाच्या कारणावरुन डोक्यात दगड मारुन जखमी केले. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी ज्ञानेश्वर मुकनर यांच्या फिर्यादीवरुन माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस जमादार श्री. किरपने करीत आहेत.

हेही वाचलेच पाहिजे....नांदेडमधील ‘ही’ सामाजिक संस्था जपतेय मानवी मूल्य, कोणती? ते वाचायलाच पाहिजे
 
४४ हजाराचा एवज पळविला
नांदेड : नांदेड शहरातील मन्यारगल्ली भागात एकाच्या बॅगमधील सोन्याचे कलसर व नगदी रक्कम असा एकूण ४४ हजाराचा एवज पळविल्याची घटना गुरुवारी (ता. १९) सायंकाळी साडेपाच वाजता घडली. मिल्लतनगर येथे राहणारे सय्यद मुनीर सय्यद शेरअली हे गुरुवारी मन्यारगल्ली येथे हातगाड्यावर कपबशी खरेदी करत असताना चोरट्याने बॅगमधील सोन्याचे दागीने व नगदी रक्कम असा एकूण ४४ हजाराचा एवज पळविला. या प्रकरणी सय्यद मुनीर यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस जमादार श्री वाकडेचा करीत आहेत. 

माहूर शहरातून ५६ हजारांची चोरी
नांदेड : माहूरमधील ब्राह्मण गल्लीत एका घरातून सोन्याचे दागिने व नगदी, असा एकूण ५६ हजारांचा ऐवज पळविल्याची घटना गुरुवारी (ता. १९) मध्यरात्री घडली. कैलास भिकू राठोड यांच्या घरी चोरट्यांनी प्रवेश करून बनावट चावीच्या आधारे घरातील बॉक्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व नगदी रक्कम ऐवज पळविला. या प्रकरणी कैलास राठोड यांच्या फिर्यादीवरून माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस जमादार श्री. राठोड करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com