घाटीत दोन मलेरिया  पॉझिटिव्ह रुग्ण दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

औरंगाबाद - पावसाळ्याच्या तोंडावर मलेरियाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण घाटीत दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एक शहरी, तर दुसरा ग्रामीण भागातून अलेल्या रुग्णाचा समावेश आहे. शहरातील टाऊन हॉल परिसरातील एकाला, तर पिंपरी गंगापूर येथील एका महिलेला मलेरियाची लागण झाली. या दोघांवरही घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली. त्या म्हणाल्या, मलेरियाचे रुग्ण समोर आल्याने नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. डासांपासून स्वत:चा बचाव करावा. डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title: Two Malaria-positive patients have been admitted in ghati hospital