व्यापाऱ्याला दोन महिने कारावास

file photo
file photo

औरंगाबाद : धनादेश अनादर प्रकरणी व्यापारी प्रशांत चंद्रप्रकाश मंत्री यास दोन महिने कारावास व सहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. भंडारी यांनी शुक्रवारी (ता. 11) दिले. सतीश लालचंद डोंगरे (40, रा. बेगमपुरा) यांनी तक्रार दिली होती.

तक्रारीनुसार, व्यापारी व त्याचा मित्र प्रशांत चंद्रप्रकाश मंत्री (रा. मोतीकारंजा) याने व्यवसायासाठी डोंगरे यांच्याकडून चार लाख रुपये हातउसने मागितले होते. मित्रत्वाच्या संबंधामुळे डोंगरे यांनी प्रशांतला दोन महिन्यांत पैसे वापस करण्याच्या बोलीवर कर्ज काढून व क्रेडिट कार्डवर चार लाख रुपये दिले होते. मुदत उलटल्यानंतरही त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने डोंगरे यांनी पैशांसाठी तगादा लावला होता. त्यामुळे प्रशांत याने डोंगरे यांना दहा हजार रुपये रोख दिले व तीन लाख 90 हजार रुपयांचा धनादेश दिला, जो वटलाच नाही. त्यानंतर डोंगरे यांनी प्रशांतला कायेदशीर नोटीस बजावली. त्यालाही दाद न दिल्याने डोंगरे यांनी न्यायालयात धाव घेतली.

खटल्याच्या सुनावणीवेळी, डोंगरे यांनी प्रशांतला पैसे दिल्याचे व त्यासाठी कर्ज काढल्याचे न्यायालयात सिद्ध केले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्षी-पुराव्यांवरून न्यायालयाने प्रशांतला भारतीय दंड संहितेच्या 138 कलमान्वये दोन महिने कारावास व सहा लाख रुपये नुकसानभरपाई व नुकसान भरपाई एक महिन्यात न दिल्यास आणखी एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात डोंगरे यांच्या वतीने ऍड. राजू पहाडिया यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com