esakal | उस्मानाबाद: मुसळधार पावसानंतर आलेल्या पूरात दोघे गेले वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद: मुसळधार पावसानंतर आलेल्या पूरात दोघे गेले वाहून

उस्मानाबाद: मुसळधार पावसानंतर आलेल्या पूरात दोघे गेले वाहून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : तालुक्यात शुक्रवारी (ता. नऊ) रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी-ओढ्यांना पूर आला. या पुरात बोरगाव राजे आणि समुद्रवाणी (ता. उस्मानाबाद) येथे प्रत्येकी एक या प्रमाणे दोघे वाहून गेले. प्रशासन रात्रीपासून त्यांचा शोध घेत आहे, अशी माहिती उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी दिली आहे. उस्मानाबाद शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. यातच बोरगाव राजे ते बोरखेडा रस्त्यावरील ओढाला पूर आला. हा ओढा पार करताना बोरखेडा येथील समीर युन्नूस शेख (वय २७) वाहून गेले. श्री. शेख हे दुचाकीवर होते. त्यांना एका शेतकऱ्याने पाण्यात जाण्यास मनाई करूनही ते पाण्यात गेले.

दुसरी घटनेत समुद्रवाणी येथे पूर पाहण्यास गेलेली एक व्यक्ती पुरात वाहून गेला आहे. ती अद्याप सापडलेली नाही, तिचाही शोध घेण्याचे कार्य शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशीही माहिती तहसीलदार श्री. माळी यांनी दिली.

हेही वाचा: संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात? शिवसेना मंत्र्याचं सूचक विधान

कार वाहून गेली, प्रवासी वाचले

समुद्रवाणी (ता. उस्मानाबाद) येथे पुलावरून एक कार पाण्यात वाहून गेली. या कारमध्ये चौघे होते. त्यापैकी दोघे पाण्याचा अंदाज घेण्यासाठी उतरले होते तर दोघे कारमध्ये होते. वाहून जाणाऱ्या कारमधील मेंढा येथील गोवर्धन विष्णू ढोरमारे (वय ५५) आणि बाबा विश्वनाथ कांबळे या दोघांना ग्रामस्थांनी सुरक्षितरीत्या बाहेर काढले आहे.

loading image