वरुडी चेकपोस्ट शेजारील तंबूत अनियंत्रित कार घुसल्याने दोन पोलिस कर्मचारी जखमी

वरुडी चेकपोस्ट शेजारील तंबूत अनियंत्रित कार घुसल्याने दोन पोलिस कर्मचारी जखमी
Updated on
Summary

जखमी जारवाल यांच्यावर सध्या औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर लोखंडे यांच्यावर वरुडी येथील नूर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

बदनापूर (जालना) : जालना - औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर वरुडी (ता. बदनापूर) चेकपोस्ट (Cheakpost) शेजारील एका दुकानाला धडकल्यानंतर अनियंत्रित झालेली कार (Car) पोलिसांच्या (Police) तंबूत जाऊन शिरल्याने दोन पोलिस (Two policemen) कर्मचारी जखमी (Injured) झाले आहेत. हा अपघात शनिवारी (ता. 22) सकाळी साडेसात वाजता घडला. (Two policemen were injured when a car rammed into the Jalna Aurangabad border)

वरुडी चेकपोस्ट शेजारील तंबूत अनियंत्रित कार घुसल्याने दोन पोलिस कर्मचारी जखमी
जालना जिल्ह्यात गादीघर, दुकानांना आग; लाखो रुपयांचे नुकसान

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने अनेक कडक निर्बंध लावले आहे. त्या अंतर्गत जालना - औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर वरुडी शिवारात वाहनांची नाकाबंदी आणि ई - पास तपासणीसाठी बदनापूर आणि करमाड पोलिसांचे पथक कार्यरत आहे. या पोलिसांना विश्रांती घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने तंबू टाकण्यात आले आहेत. दरम्यान, या ठिकाणी शुक्रवारी (ता. 21) रात्री बदनापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी गजानन जारवाल, गृहरक्षक दलाचे जवान चंद्रकांत लोखंडे, अमोल रगडे व आरोग्य कर्मचारी के. व्ही. मोरे कर्तव्यावर होते.

वरुडी चेकपोस्ट शेजारील तंबूत अनियंत्रित कार घुसल्याने दोन पोलिस कर्मचारी जखमी
जिंतूर-जालना रोडवर संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला

सकाळी साडेसहा वाजता पोलिस नाईक गजानन जारवाल व होमगार्ड चंद्रकांत लोखंडे काहीवेळ विश्रांतीसाठी तंबूतील पलंगावर बसले होते. तेव्हा औरंगाबादहून जालन्याकडे भरधाव वेगाने जाणारी बोलेरो जीप (क्रमांक : एम. एच. 42, ए. एक्स. 1687) चेकपोस्ट जवळील एका दुकानाला जाऊन धडकली. त्यानंतर अनियंत्रित होऊन ती थेट पोलिस विश्रांती घेत असलेल्या तंबूत शिरली. या घटनेत गजानन जारवाल यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तर चंद्रकांत लोखंडे यांना देखील किरकोळ मार लागला आहे. जखमी जारवाल यांच्यावर सध्या औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर लोखंडे यांच्यावर वरुडी येथील नूर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. अपघातानंतर कार चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला आहे. अपघातग्रस्त वाहन बदनापूर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी बदनापूर पोलिसांत दुपारी तीन वाजेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

वरुडी चेकपोस्ट शेजारील तंबूत अनियंत्रित कार घुसल्याने दोन पोलिस कर्मचारी जखमी
जालना जिल्ह्यात झालेल्या दुचाकी अपघातात जिंतूर तालुक्यातील मजूर ठार

आम्ही रात्री चेकपोस्टवर कर्तव्यावर होतो. सकाळी काहीशी विश्रांती घेण्यासाठी तंबूतील पलंगावर बसलो असता बोलेरो जीप तंबूत शिरून आम्हाला धडकली. तेव्हा माझ्या छातीला मुक्कामार लागला. मात्र चालक गोंधलेला असल्याने त्याने आपली जीप मागे घेताना ती माझ्या हातावरून गेल्याने माझा हातही फ्रॅक्चर झाला आहे. माझ्या सहकार्यांनाही मार लागला आहे.

- गजनान जारवाल, पोलिस नाईक, बदनापूर पोलिस ठाणे

(Two policemen were injured when a car rammed into the Jalna Aurangabad border)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com