दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत पथकाने लाच घेताना पकडले

दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत पथकाने लाच घेताना पकडले

औरंगाबाद  (जि.औरंगाबाद) ः पगाराचा फरक व वार्षिक वेतनवाढ सातव्या वेतन आयोगाप्रमाणे लागू करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाकडून चार हजार रुपयांची लाच घेताना येथील नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपतच्या पथकाने पकडले. वरिष्ठ लिपिक सर्जेराव रामराव गव्हाणे, लिपिक अशोक बाबूराव वाणी अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादीचे वडील हे नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.

त्यांच्या पगाराचा फरक व वेतनवाढ सातव्या आयोगाप्रमाणे लागू करावयाची होती. त्यासाठी आरोपींनी चार हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र लाच देण्याची फिर्यादीची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलिस अधीक्षक अनिता जमादार, पोलिस उपअधीक्षक ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप राजपूत, कर्मचारी रवींद्र देशमुख, गोपाळ बरंडवाल, श्री. पाठक, श्री. राठोड, श्री. बागूल यांच्या पथकाने सापळा रचून विनायकराव पाटील महाविद्यालय परिसरात दोघांना लाच घेताना पकडले. त्यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com