सेलूत कर्तव्यात कसूर करणारे दोन शिक्षक निलंबित

विलास शिंदे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

सेलू : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेसंदर्भात परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज हे तालुकानिहाय शिक्षण परिषदांच्या माध्यमातून शाळा व केंद्रांचा आढावा घेत असून, सर्व शाळेतील प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे. याबाबत ते आग्रही आहेत. याकामी हयगय करणाऱ्या सेलू तालुक्यातील दोन प्राथमिक शिक्षकांवर मंगळवारी (ता.१८) रोजी पृथ्वीराज यांनी निलंबनाची कार्यवाही केली.

सेलू तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या अध्ययन स्तर निश्चितीबाबत १२ डिसेंबर रोजी सेलू येथील शिक्षण परिषदेत पृथ्वीराज यांनी स्वतः आढावा घेतला होता. सेलू तालुक्यातील सर्वात खालच्या स्तरावर गुणवत्ता असलेल्या प्राथमिक शाळा गुळखंड (फाटा) व प्राथमिक शाळा रामनगर शाळांच्या कमी गुणवत्तेसंदर्भात तेथे कार्यरत शिक्षक समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. यामुळे सदर दोन शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सेलू यांच्यामार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. केंद्रप्रमुख कुपटा व केंद्रप्रमुख डासाळा यांच्यामार्फत सदर शाळांची चौकशी करण्यात आली.

संबंधितांचा असमाधानकारक खुलासा व चौकशी अहवालाच्या अनुषंगाने प्राथमिक शाळा गुळखंड (फाटा) येथे कार्यरत बी. एल. जावळे व रामनगर येथे कार्यरत डी. डी. सोळंके यांना कर्तव्यात कसूर करणे, शिक्षक पदाच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार न पाडणे, शालेय गुणवत्ता कमी असणे, इत्यादी कारणास्तव (ता.१८)  रोजी पासून जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांच्या कडक भूमिकेमुळे जिल्हा परिषद शिक्षकांना कर्त्यव्यदक्ष राहून गुणवतापूर्ण शिक्षण देणे क्रमप्राप्त असल्याचे पुनःश्च एकदा अधोरेखित झाले आहे.

Web Title: Two Teachers Suspended who failed in the duties