दोन हजार दुचाकींची फेरी काढून गेवराईच्या ठिय्यात सहभाग

वैजिनाथ जाधव
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षझ मागणीसाठी शहरात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा बुधवारी (ता. आठ) सहावा दिवस असून ठिय्यात सहभागासाठी सिरसदेवी गटातून दोन हजार दुचाकींची फेरी काढून चार हजार मराठा बांधवांनी सहभाग घेतला.

गेवराई : मराठा आरक्षझ मागणीसाठी शहरात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा बुधवारी (ता. आठ) सहावा दिवस असून ठिय्यात सहभागासाठी सिरसदेवी गटातून दोन हजार दुचाकींची फेरी काढून चार हजार मराठा बांधवांनी सहभाग घेतला.

गगनभेदी घोषणा देत ही फेरी आंदोलनस्थळी पोचली. शहरातील  नगरपरिषदसमोरील शास्त्री चौकात मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु आहे. आंदोलनात ग्रामीण भागातील तरुण व वयोवृद्ध तसेच महिलाही सहभाग नोंदवित आहेत. दररोज एका जिल्हा परिषद गटाने सहभाग घेण्याचे ठरल्यानुसार बुधवारी सिरसदेवी गटातील अठरा गावांतून चार हजार मराठा बांधवांनी दुचाकी फेरी काढून सहभाग नोंदविला.

Web Title: two thousand bike rally in gevarai