Bike Accident : अंबड-घनसावंगी मार्गावरील वलखेडा फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक दीपक मंत्री ठार

जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील व्यापारी दीपक भिकुलाल मंत्री यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने या अपघात मंत्री हे जागीच ठार झाल्याची घटना घडली.
Deepak Mantri

Deepak Mantri

sakal

Updated on: 

अंबड - जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील व्यापारी दीपक भिकुलाल मंत्री (वय-62) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने या अपघात मंत्री हे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील दीपक मंत्री हे दुपारी अंबड शहरातुन घनसावंगी तालुक्यातील मोहपुरी येथील शेतात बुधवारी (ता. 21) गेले होते. सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास अंबड शहराकडे येत असताच वलखेडा फाट्यालगत त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने दीपक मंत्री हे जागीच ठार झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com