दुचाकीवरून पडून तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

सोयगावकडून माळेगाव (पिंपरी, ता. सोयगाव) येथे जाताना कंकराळा गावाजवळ अचानक दुचाकीचे टायर फुटल्याने दगडाच्या ढिगाऱ्यावर पडून जखमी झालेल्या तरुणाचा उपचारासाठी घेऊन जाताना (नेरी, ता. जामनेर) गावाजवळ मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता. 22) सायंकाळी झाला.

सोयगाव (जि.औरंगाबाद) ः सोयगावकडून माळेगाव (पिंपरी, ता. सोयगाव) येथे जाताना कंकराळा गावाजवळ अचानक दुचाकीचे टायर फुटल्याने दगडाच्या ढिगाऱ्यावर पडून जखमी झालेल्या तरुणाचा उपचारासाठी घेऊन जाताना (नेरी, ता. जामनेर) गावाजवळ मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता. 22) सायंकाळी झाला.

अजय सुभाष मोरे (वय 26, रा. माळेगाव पिंपरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. आठवडे बाजार करून सोयगावहून माळेगावकडे दुचाकीवर जाताना कंकराळा गावाजवळील नाल्याजवळ अजय मोरे याच्या दुचाकीचे अचानक टायर फुटले. रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या दगडांच्या ढिगाऱ्यावर आदळून त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. जळगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी त्याला जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले; मात्र डॉक्‍टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्‍चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Wheeler Rider Died