वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

अपघात
अपघात

फुलंब्री (जि.औरंगाबाद) ः फुलंब्री-राजूर रस्त्यावरील डोंगरगाव कवाडजवळ वाहनाच्या धडकेने एकजण ठार झाला. ही घटना शनिवारी (ता. 19) रात्री नऊच्या सुमारास घडली.


जगन्नाथ रामराव भोपळे (वय 42, रा. डोंगरगाव कवाड, ता. फुलंब्री) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जगन्नाथ भोपळे हे दुचाकीवर (एमएच-20, एडी- 7343) वर डोंगरगावला येत असताना त्यांच्या दुचाकीला एका वाहनाने जोराची धडक दिली. यात त्यांच्या डोक्‍याला जबर मार लागला. रिमझिम पाऊस सुरू असल्याने त्या रस्त्यावरून बराच वेळ कोणी गेले नाही; परंतु साडेआठला जाणाऱ्या-येणाऱ्यांनी दुचाकी पडलेल्या घटनास्थळी धाव घेतली असता सदर अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी फुलंब्री येथील महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांना घटनेची माहिती दिल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे भोपळे यांना फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉ. अंगद घुले यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह फुलंब्री ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com