बसच्या चाकाखाली आल्याने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

चापानेर (ता. कन्नड) जवळील जळगाव घाट रस्त्यावर बस, मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.19) रात्री आठच्या सुमारास घडली. अशोक एकनाथ जाधव  अपघातातील मृताचे नाव आहे. ते मोटारसायकलवर जळगाव घाटकडे जात असताना समोरून येणारी बस व दुचाकीची धडक झाली.

चापानेर (जि.औरंगाबाद) : चापानेर (ता. कन्नड) जवळील जळगाव घाट रस्त्यावर बस, मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.19) रात्री आठच्या सुमारास घडली. अशोक एकनाथ जाधव  अपघातातील मृताचे नाव आहे. ते मोटारसायकलवर जळगाव घाटकडे जात असताना समोरून येणारी बस व दुचाकीची धडक झाली.

हेही वाचा-खुन केला अन् चार लाख लुटले, चौघांना पोलिस कोठडी

बसच्या चाकाखाली आल्याने अशोक जाधव यांचा मृत्यू झाला. कन्नड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चापानेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.सदर घटनेची नोंद पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय जारवाल करीत आहेत.

खून केला अन् चार लाख लुटले, चौघांना पोलिस कोठडी

सिल्लोड : येथील वाईन शॉपवरील काम करणाऱ्याचा खून करून चार लाख रुपयांची लूट केल्याप्रकरणी बुधवारी (ता.19) अटक करण्यात आलेले संशयित आरोपी अजय गुलाबराव रगडे (वय 30, रा. सातारा परिसर, औरंगाबाद), चेतन अशोक गायकवाड (34, रा. शिक्षक कॉलनी, सिल्लोड), संदीप आसाराम गायकवाड (26, रा. कैकाडी गल्ली, परतूर) यांना गुरुवारी (ता. 19) सिल्लोड शहर पोलिसांनी दुपारी तीनच्या सुमारास न्यायालयात हजर केले. सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी राजेंद्र बोकडे यांनी न्यायालयास विनंती केली, की आरोपींनी हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करायचे आहे.

हे वाचलंत का?-बीड जिल्ह्यात गर्भवती नवविवाहितेचा मृतदेह आढळला, खुनाचा आराेप

ज्या शर्टाचे बटन मिळाले त्यासंबंधी पुरावे गोळा करणे बाकी आहे. घटनास्थळावरून चप्पल जप्त केलेली आहे. याबाबतचे पुरावेही गोळा करायचे आहेत. त्यामुळे आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. यावर न्यायाधीश आर.पी.थोरे यांनी आरोपींना रविवारपर्यंत चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींचे मागील पोलिस रेकॉर्ड व घटना गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.

क्लिक करा- अरेच्चा..! प्रेमाची भूक बीडच्या प्राध्यापकाला पडली नऊ लाखांत...

शहरातील प्रियदर्शिनी चौकात असलेल्या एका वाईन शॉपवर कामावर असलेले कर्मचारी भिकन निळुबा जाधव (48, रा. मोढा, ता. सिल्लोड) तसेच त्यांचा साथीदार लक्ष्मण पुंजाजी मोरे हे ता. 12 मे 2019 रोजी दुकान बंद करून रोख रक्कम घेऊन जयभवानीनगर येथील घरी जात होते. रात्री साडेदहाच्या दरम्यान भराडी रस्त्यावरील जयभवानीनगर परिसरामध्ये आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करून रोख रक्कम घेऊन ते पसार झाले होते.
घटनेमध्ये भिकन जाधव यांचा मृत्यू झाला होता.

उघडून तर पाहा- बोक्याने फोडली हॉटेलची काच; पोलिसांनी केली अटक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Wheeler Rider Died In Accident Kannad