हिंगोली जिल्ह्यात वीज कोसळून महिलेसह तरुणी ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

फाटा गावात आज (ता. 19) वीज कोसळून एका महिलेसह एक तरुणी जागीच ठार झाली.

वसमत (जि. हिंगोली) - तालुक्यातील खांडेगाव अकोली जवळील फाटा गावात आज (ता. 19) वीज कोसळून एका महिलेसह एक तरुणी जागीच ठार झाली.

या दोघींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे नेण्यात आले आहेत. गयाबाई प्रकाश काकडे (वय 46) आणि लोचना नारायण काकडे (वय 16, दोघी रा. फाटा) अशी मृतांची नावे आहे.

प्राप्त माहितीनुसार, शेतात काम करताना विजेच्या गडगडाटासह अचानक पाऊस आला. यावेळी वीज कोसळून गयाबाई आणि लोचना ठार झाल्या. या घटनेमुळे फाटा गावावर शोककळा पसरली आहे. मृताच्या कुटुंबीयांना शासानाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two women killed in lightning fell at Fata tq Wasmat