बुरखा घालून भिक मागताना दोन महिलांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

शहरात मुले पळवीणारी टोळी आली या आफवेने भिक मागणाऱ्या दोन महीलासह चौघांना बसस्थानकात व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमावाने मारहाण करुन पोलिसात दिले आहे. 

मंठा- शहरात मुले पळवीणारी टोळी आली या आफवेने भिक मागणाऱ्या दोन महीलासह चौघांना बसस्थानकात व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमावाने मारहाण करुन पोलिसात दिले आहे. 

ईदचा सण असल्याने शहरात सकाळ पासून गर्दी होती. मुस्लिम बांधव ईदगाहकडे जाऊन नमाज अदा करुन परत येत होते. तर हिंदू बांधव मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा देताना दिसत होते. या उत्साही वातावरणात बसस्थानकात मुले पळवीणारी टोळी आली या आफवेने गर्दी झाली व गर्दीत दोन बुरखा घातलेल्या महीलाना जमावाने मारहाण करुन पोलिसात कळविले. पोलिसांनी दोघींना पोलीसात आणल्या नंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमावाने दोघांना मारहाण करीत पोलिस ठाण्यात आणले. 

कविता राजू चव्हाण  (वय 22 वर्ष ) रा. चारठाणा, ता. जिंतूर जि.परभणी  व यमा भगवान पवार रा. कुर्हाणपूर, ता. लोणार, जि. बुलढाणा येथील या महिला असुन दोघी ईद निमित्त जास्त पैसे मिळतील म्हणून बुरखा घालून भिक मागत होत्या. 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दुपारी दीड ते दोन वाजे दरम्यान वाटूर ता. परतूर जि. जालना येथील सचिन रामभाऊ पाटोळे  (वय 20 वर्ष) व संभाजी संजय पाखरे (वय 16 वर्षे) हा दहावीत शिकणारा विद्यार्थी ईद निमित्त शिरखुर्म्याची भिक मागत फिरत असताना मुलं पळवीणारे म्हणून गल्लीतील नागरीकांनी त्यांना मारहाण केली. 

Web Title: Two women were arrested