esakal | दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा तरुणांचा, तर एका महिलेचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

accident

उमरगा तालुक्यात सोमवारी (ता.२१) दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा तरुणांचा, तर एका महिलेचा मृत्यू झाला.

दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा तरुणांचा, तर एका महिलेचा मृत्यू

sakal_logo
By
अविनाश काळे / नंदकुमार जाधव

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा-लातूर मार्गावरील माडज पाटीजवळ उमरग्याहुन नारंगवाडीच्या दिशेने वेगाने निघालेल्या आयशर टेम्पोने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने बाबळसूर (ता.उमरगा) येथील दोन तरुणाचा जागीच मृत्यु झाला. टेम्पोने दुसऱ्या एका दुचाकीला धडक दिली. मात्र त्यावरील दुचाकीस्वार बचावला आहे. सोमवारी (ता.२१) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन नाही, अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन


या बाबतची माहिती अशी की, कोथिंबीर घेऊन नारंगवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या आयशर टेम्पोने (एमएच १३ सीयु २४६६) दुचाकीवरून (एमएच २५ केयू ७२६६) निघालेल्या दोघांना धडक दिल्याने शरद निवृत्ती सूर्यवंशी (वय ३५), संभाजी बाबुराव कुलकर्णी (वय ३६ रा.दोघेही बाबळसूर, ता.उमरगा) यांचा मृत्यू झाला. टेम्पोची धडक इतकी मोठी होती की, दोघे तरूण शंभर फुट लांब उडून पडले. दरम्यान टेम्पो चालकाने दुसऱ्या दुचाकीला धडक दिली.

प्रसंगावधावन ओळखून दुचाकीवरील तरुणाने बाजूला उडी मारून जीव वाचवला. तो तरूण चलबुर्गा (ता. औसा) येथील रहिवाशी असून श्रीकृष्ण श्रीमंत आळणे (वय २२) असे त्याचे नाव आहे. तो पनीर विक्रीचा व्यवसाय करतो. पनीर घेऊन तो जकेकूर - चौरस्त्याकडे निघाला होता. सकाळचे माडजचे बातमीदार नंदकुमार जाधव अपघातस्थळी होते. त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले आणि जखमी तरूण श्रीकृष्णला धीर दिला. सहायक पोलिस निरीक्षक विशाखा धुळे पाऊण तासाने घटनास्थळी दाखल झाल्या. टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

उमरग्यात पाणीपुरवठ्याच्या अडचणी वाढल्या, ढिसाळ कारभाराचा शहरवासीयांना फटका

ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू
जकेकुर (ता.उमरगा) येथील शेषाबाई शिवाजी डोंगरे (वय ४९) ही महिला गावाकडे जाण्यासाठी चौरस्ताचे येथे रिक्षाची वाट पाहत थांबली होती. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हैदराबादवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने (आरजे १९ जीएफ ७४४९) जोराची धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच जकेकुरचे उपसरपंच अनिल बिराजदार, सागर बिराजदार, माऊली बिराजदार, रवि पाटील, एजाज पठाण, अमर बिराजदार आदी युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिस हवालदार एस. जी. शिंदे, पोलिस नाईक एन. बी. वाघमारे, बिट अंमलदार कांत राठोड यांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेह ताब्यात घेतला व उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता जकेकुर येथे अंत्यविधी करण्यात आला. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तुळजापूर तालुक्यातील पांगरधरवाडी गावाचा संपर्क तुटला, पहाटेपासून जोरदार पाऊस

संपादन - गणेश पिटेकर