मोटारसायकलींची समोरासमोर धडक, दोघा तरूणांचा दुर्दैवी मृत्यू  

विश्वनाथ गुंजोटे
Tuesday, 19 January 2021

किल्लारी पाटीपासुन उमरग्याला जाणाऱ्या लातुर-उमरगा राष्ट्रीय महामार्गावर एक किलोमीटर अंतरावर मंगळवारी (ता.१९)  दोन मोटर सायकलची समोरासमोर धडक होऊन दोन्ही मोटारसायकवरील तरुण अपघातात गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू झाला.

किल्लारी (जि.लातूर) : किल्लारी पाटीपासुन उमरग्याला जाणाऱ्या लातुर-उमरगा राष्ट्रीय महामार्गावर एक किलोमीटर अंतरावर मंगळवारी (ता.१९)  दोन मोटर सायकलची समोरासमोर धडक होऊन दोन्ही मोटारसायकवरील तरुण अपघातात गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्तांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

शेतकऱ्याच्या आयटी इंजिनिअर मुलीची ग्रामपंचायतीत ऐटीत एन्ट्री, मतदारांनी केले भरघोस मतदान

विशेष पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किल्लारीकडून उमरगाकडे जाणाऱ्या महामार्गावर निलेश मदन पाटील ( वय २३, राहणार वानेवाडी, ता.औसा) हा तरुण मोटरसायकल  (एमएच २४ बीएच ०५२४), दुसरी  मोटरसायकल (एमएच २५ ऐक्यु ३२१७) स्वार समाधान राम कांबळे ( वय २६, राहणार कवठा ता. उमरगा जि. उस्मानाबाद ) या दोघाची समोरासमोर धडक होऊन  गंभीर जखमी अवस्थेत दोघांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे दाखल केले असता त्यांना डॉ.पांडुरंग दोडके यांनी मृत घोषित केले. याबाबत डॉक्टर एम.के.अनीगुंट्टे यांच्या माहितीवरुन किल्लारी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास बिट जमादार जी. एम .भोळे करित आहेत.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Youth Died In Motorcycles Accident Latur Latest News