औरंगाबाद शहरात लवकरच टायरकिलर स्पीडब्रेकर

औरंगाबाद शहरात लवकरच टायरकिलर स्पीडब्रेकर

औरंगाबाद - अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता पुण्याच्या धर्तीवर आता शहरातील रस्त्यांवरही टायरकिलर स्पीडब्रेकर लावण्याची आमची संकल्पना असल्याचे मंगळवारी (ता. २७) पोलिस उपायुक्‍त दीपाली घाडगे यांनी सांगितले. यामुळे राँग साईड वाहने चालविणाऱ्यांवरही नियंत्रण मिळविणे सोपे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीची बैठक झाली. यावेळी शहरात होणारा वाहतुकीचा खोळंबा, अपघात यावर चर्चा झाली. त्यावर घाडगे म्हणाल्या, की वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाढते अपघात यावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाय म्हणून टायर किलर स्पीड ब्रेकर लावता येईल. नियमांचे पालन न करण्याचे प्रकार शहरात सर्रास पाहायला मिळतात. यामुळे शहरात अपघात होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या बरीच आहे. यावर खासदार खैरे यांनी प्रशासनाला खडसावले. खैरे म्हणाले, की शहरात ट्रिपल सीट दुचाकी चालविण्याला बंदी आहे. तरीदेखील नागरिक सर्रास वाहतूक नियम मोडताना दिसत आहेत. त्यावर उपाय सुचविताना घाडगे म्हणाल्या, की आता ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून त्यांचा वाहन परवाना रद्द केला जाईल. मात्र, हे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आहेत. ट्रिपल सीट वाहनधारकांविरुद्ध जागेवरच कारवाई व्हावी, यासाठी आरटीओंशी बोलणे सुरू आहे. चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होतात. त्यामुळे टायर किलर स्पीड ब्रेकर बसविण्याची योजना आहे. तसेच पोलिसांकडून होणाऱ्या दंडात्मक कारवाईत गोळा होणारा महसूल काही प्रमाणात पोलिस प्रशासनास मिळायला हवा.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, सीईओ पवनीत कौर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, अशोक शिरसे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com