Uddhav Thackeray calls Fadnavis a betrayer
esakal
देवेंद्र फडणवीस याचं सरकार दगाबाज असून त्यांना सत्तेतून खाली खेचणं हाच ऐकमेव पर्याय आहे. या सरकारने शेतकऱ्यांशी दगाबाजी केली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे हे आजपासून चार दिवस मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी आज बीडच्या पाली येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनावरही भाष्य केलं.