वसंतदादांचं सरकार घालवलं; पण आमचं नाही घालवू शकत : उद्धव ठाकरे

माधव सावरगावे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

घनसावंगी : शिवसेना-भाजपची युती स्वच्छ आहे. निवडणूकीनंतर नेता कोण हे स्पष्ट आहे, त्यामुळे पुन्हा आमचंच सरकार येणार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घनसावंगी येथे झालेल्या प्रचारसभेत केला. 

विकास योजना पोहोचविण्यासाठी भाजप कटिबद्ध : योगी आदित्यनाथ

जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला परभणीचे खासदार संजय जाधव, प्रकाश शेंडगे यांचीही उपस्थिती होती.

यावेळी बोलताना त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन शरद पवार यांच्यावरही टीका केली. कोणत्याही परिस्थितीत मी हे सरकार घालवीन असं शरद पवार सांगतात. तुम्हाला मुख्यमंत्री पदासाठी स्वतःच सरकार घालवण्याचा अनुभव आहे. मात्र, वसंतदादा पाटील यांचं सरकार घालवण्याइतकं हे सरकार सोपं नाही. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uddhav thackeray criticizes sharad pawar