uddhav thackeray lok sabha election maha vikas aghadi nitin gadkari politics
uddhav thackeray lok sabha election maha vikas aghadi nitin gadkari politicsSakal

Uddhav Thackeray : देश हाच धर्म समजुन भाजपाच्या हुकुमशाहीला तडीपार करा; उद्धव ठाकरे

नितीनजी राजीनामा द्या ... महाविकास आघाडीकडून निवडुन आणू !

उमरगा : आमचं हिंदुत्व सर्वसामान्यांच्या घरातील चुल पेटवणार आहे, भाजपच हिंदु मात्र घर पेटवणार आहे. लोकशाहीचा मुडदा पाडण्यासाठी सुरू असलेली भाजपाची रणनिती गाडण्यासाठी सर्व जाती, धर्मातील लोकांनी धर्म बाजुला ठेऊन देश हाच धर्म समजुन एकजुटीने भाजपाच्या हुकुमशाहीला तडीपार करा असे आवाहन माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

उमरगा शहरात जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने

शहरातील (कै.) शिवाजीराव मोरे क्रीडा संकुल छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कडाडून टिका केली. या वेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, खासदार संजय राऊत, मिलींद नार्वेकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,

उप नेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार दिनकर माने, शिवसेनेचे जेष्ठ नेते बाबा पाटील, मकरंदराजे निंबाळकर, जेष्ठ शिवसैनिक अशोक सांगवे, काँग्रेसचे जिल्हा सचिव अश्लेष मोरे, तालुकाध्यक्ष अँड. सुभाष राजोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पवार, उमरगा बाजार समितीचे सभापती रणधीर पवार,

रज्जाक अत्तार, बाबुराव शहापुरे, सुधाकर पाटील, अजिंक्य पाटील, अजित चौधरी आदींची उपस्थिती होती. या वेळी अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर, सुषमा अंधारे यांनी भाजपाच्या कुटनितीवर प्रहार करत आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावर टिका केली. यावेळी काँग्रेसच्या वतीने उद्घव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आले.

होय मी आदित्यला मुख्यमंत्री करेन !

" देशाचे गृहमंत्री अमित शहा माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करतात. माझे आजोबा, वडिलांची या राज्य व देशातील लोककल्याणासाठी घराणेशाही होती. शहा, मोदीचे काय कर्तृत्व. असा टोला लगावत, होय मी तुमची साथ असेल तर आदित्यला मुख्यमंत्री करेन. असे  उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

नितीनजी राजीनामा द्या ... महाविकास आघाडीकडून निवडुन आणू !

भाजपाच्या पहिल्या यादीत नरेंद्र मोदी, अमित शहाच्या बरोबरीने भ्रष्टाचारी कृपाशंकरसिंह असे नाव आहे मात्र ज्या नितीन गडकरींनी भाजप रूजवली, त्यांचे नाव नाही. कशाला असल्या पक्षात रहाता, राजीनामा देऊन या आमच्याकडे प्रचंड मताने निवडून आणू असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना केले. यावेळी ठाकरे यांनी निवडणूक आयुक्ताला धोंड्या आणि विधानसभा अध्यक्षांना लबाड्या असा शब्दप्रयोग केला.

तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो ...

तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की, त्या वेळी अमित शहा यांनी शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद पदाचा शब्द दिला होता. मात्र ते खोटं बोलताहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com