
Uddhav Thackeray: मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर केली, परंतु ती तुटपुंजी ठरत असल्याने विरोधकांनी आवाज उठवलाय. त्यातच गुरुवारी उद्धव ठाकरे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहाणी केल्यानंतर बीडच्या मांजरसुंभा गावात पत्रकार परिषद घेतली.