Corona Breaking : उदगीरात सारीने दोघांचा मृत्यू; आणखी १३ रुग्ण पॉझिटिव्ह

युवराज धोतरे 
Thursday, 6 August 2020

कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या देगलूर रोडवरील आप्पाराव चौकातील एका चाळीस वर्षीय महिलेचा बुधवारी (ता.५) रात्री दहाच्या सुमारास व विकास नगर भागातील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी सकाळी दहा वाजता सारीने मृत्यू झाला.

उदगीर (लातूर) : येथील कोरोना रुग्णालयात गुरूवारी (ता.६) रोजी दोन जणांचा सारीने मृत्यू झाला आहे. गुरुवारी तब्बल तेरा कोरोना बाधित रूणांची वाढ झाली असून दिवसेंदिवस संसर्गाचा धोका वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना बळीमुळे उदगीर शहरात चिंता व्यक्त केली जात आहे.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या देगलूर रोडवरील आप्पाराव चौकातील एका चाळीस वर्षीय महिलेचा बुधवारी (ता.५) रात्री दहाच्या सुमारास सारीने मृत्यू झाला. शहरातील विकास नगर भागातील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास सारीने मृत्यू झाला. पुन्हा शहर व परिसरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. येथील रुग्णालयात मुखेड, जळकोट, देवणी, अहमदपूर या भागातील रुग्ण दगावत असल्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक बनले आहे. बुधवारी (ता.५) रोजी उशिरा आलेल्या अहवालात पुन्हा अठरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर गुरुवारी तेरा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

सद्या येथील कोरोना रुग्णालयात उदगीर ४४०, जळकोट ५, निलंगा २, अहमदपूर ६, मुंबई ३, चाकूर ६, हैदराबाद १, मुखेड ४, देवणी १४, बिदर ४, पुणे १ शिरूर अनंतपाळ १ अशा  कोरोणाची बाधा झालेल्या एकुण ४८६ रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी ३० जणांचा मृत्यू झाला झाला आहे. यापैकी २४१ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे. ५९ रुग्णांना उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

सध्या कोविड रुग्णालयात ४९ तर तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटर येथे ५७ रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश हरिदास व कोव्हिड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.

संपादन-प्रताप अवचार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udgeer city corona update 13 new patient and two SARI patient death