esakal | उदगीर : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी दोघास दहा वर्ष सक्तमजुरी । Latur
sakal

बोलून बातमी शोधा

 abusing a minor girl

उदगीर : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी दोघास दहा वर्ष सक्तमजुरी

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर : गेल्या पाच वर्षापूर्वी उदगीर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन आरोपींना दहा वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी वीस हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. याबाबत सरकारी वकील अँड शिवाजी बिरादार यांनी दिलेली अधिक माहिती अशी की उदगीर तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तालुक्यातील एका पोलिस ठाण्यात पाच वर्षापूर्वी लैंगिक बाल अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा: मांजराचे दरवाजे बंद तर निम्न दुधनातुन विसर्ग सुरू

हे प्रकरण येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात (दुसरे) विशेष सत्र न्यायालय चालवण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व साक्षीदाराच्या जवाबावरून आरोपी सचिन शेषेराव सारोळे यास व त्यास मदत करणाऱ्या केवळाबाई तुकाराम सारोळे या दोघांनाही जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय पी मानाठकर यांनी दहा वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

हेही वाचा: बँकेत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी झालेल्या या शिक्षेने या परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपींचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एल व्ही राख यांनी तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष सत्र न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते या प्रकरणात साक्षी दिलेल्या साक्षीदारांचे म्हणणे ग्राह्य धरून ही शिक्षा ठोठावण्यात आली असल्याची माहिती सरकारी वकील अँड बिरादार यांनी दिली आहे.

loading image
go to top