esakal | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उदगीरचा दसरा महोत्सव रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

20coronavirus_105_0

उदगीर शहरात प्रतिवर्षी सामुदायिक दसरा महोत्सव येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर होत असतो. मात्र यावर्षी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक दसरा महोत्सव रद्द करण्यात आली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उदगीरचा दसरा महोत्सव रद्द

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : शहरात प्रतिवर्षी सामुदायिक दसरा महोत्सव येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर होत असतो. मात्र यावर्षी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक दसरा महोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड गुलाब पटवारी यांनी दिली आहे. येथील विविध समाजातील पालखी मिरवणुकीद्वारे असंख्य नागरिक सहभागी होऊन शारीरिक खेळ ध्वजपूजन, शस्त्रपूजन, सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना होत असते.

पवार साहेब निश्‍चित रुपाने एकनाथ खडसेंना योग्य ती जबाबदारी देतील - नवाब मलिक


या वर्षी जागतिक कोरोना प्रादुर्भावाचे दुष्परिणाम होत असल्याने सामुदायिक दसरा महोत्सव समितीची बैठक होऊन या वर्षाचा महोत्सव सार्वजनिक करण्यात येऊ नये. सर्व पालखी शहरातून मिरवणुकीने जिल्हा परिषद मैदानावर जाऊ नये असे सर्व सहमतीने एकमताने ठरविण्यात आले. प्रशासनाच्या वतीने ही सतत कोरोनाबद्दल सामाजिक खबरदारी ठेवूनच राहवे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करून जास्त लोकांनी‌ एकत्र जमाव न होण्याच्या सूचना नागरिकाना देण्यात येत आहेत.

त्यासाठी या वर्षाचा महोत्सव आंनदाने पण साधेपणाने साजरे करावे, असे बैठकीत ठरले आहे. सुखदेव स्वामी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उद्धव महाराज हैबतपुरे, सचिव ओमप्रकाश गर्जे, बाबुराव पांढरे, नामदेव आपटे, अविनाश रायचुरकर, पांडुरंग आपटे, देविदास बजाज, अनुप मोरे, मोतीलाल डोईजोडे, शातंवर्धन रंगदळ आदी उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षकांना भेटुन याबाबतचे निवेदन दिले. १९९२ मध्ये आलेल्या किल्लारी येथील भुकंपात अनेक लोक मृत्यूमुखी पडले होते. त्यावेळस ही या दुःखात उदगीरचा सामुदायिक दसरा महोत्सव‌ रद्द करण्यात आला होता. परत २८ वर्षानंतर करोना महामारीमुळे परत उदगीरकरांनी सामाजिक भान राखून सीमोल्लंघन उत्सव साजरे न करण्याचे ठरवले असल्याचे ॲड. पटवारी यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर