esakal | उदगीर: खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून मनसेचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

udgir

उदगीर: खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून मनसेचे आंदोलन

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर : शहरातील नांदेड बिदर महामार्गावरील नांदेड नाका तसेच उदय पेट्रोल पंपा समोर खड्ड्यामध्ये दररोज अनेक मोटर सायकल स्वाराचे अपघात होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी भरत असल्याने रस्त्याच्या मधोमध खड्डे आल्याने त्यांचा खोलीचा व खड्डे असण्याचा अंदाज येत नसल्याने भरधाव वेगाने येणारे मोटरसायकलस्वार यात पडत आहेत.

हेही वाचा: उड्डान पुलावरुन पडून मोटारसायकल स्वाराचा मुत्यू

त्यामुळे गुरूवारी (ता.२) मनसेच्या वतीने या खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून त्यांस फुले वाहून नारळ फोडून निषेधात्मक आंदोलन केले. या खड्ड्यामुळे होत असलेल्या या अपघातामुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या खटल्याबाबत अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी व तोंडी कळवू नये याकडे ती कायमची दुरुस्ती करण्यात आली नाही.

त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावरही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येऊन तात्काळ खड्ड्यांची दुरुस्ती नाही. झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उदगीर शहर शाखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन आंदोलन करुन उपजिल्हाधिकारी यांना दिले आहे.

हेही वाचा: परळीत वैद्यनाथ अर्बन बँकचा अधिकारी ताब्यात

या आंदोलनासाठी शहराध्यक्ष अभय सूर्यवंशी, शहर सचिव अमोल गाजरे, शहर उपाध्यक्ष संतोष भोपळे, लखन पूरी, श्रीकांत बिरादार, पवन राठोड, रजत शेटकर, सचिन नागपूरने, कृष्णा भताने, अशोक कराड, दया डोंगरे, जरगर उबेद, विजय रेड्डी, नामदेव राठोड आदींनी सहभाग घेतला.

loading image
go to top