Motivation News : गवळी दांपत्याने फुलविला स्ट्रॉबेरीचा मळा; तालुक्यातील स्ट्रॉबेरीचा पहिलाच प्रयोग

उदगीर येथील गवळी दाम्पत्याने शहरालगत असलेल्या आपल्या शेतातील पॉलिहाऊस मध्ये स्ट्रॉबेरीचा मळा फुलविला आहे.
strawberry production
strawberry productionsakal

उदगीर (जि. लातुर) - येथील गवळी दाम्पत्याने शहरालगत असलेल्या आपल्या शेतातील पॉलिहाऊस मध्ये स्ट्रॉबेरीचा मळा फुलविला आहे. ही स्ट्रॉबेरीची लागवड हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग आहे. हा प्रयोग किती प्रमाणात यशस्वी होतो याकडे सर्व शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

मूळ विदेशातील असलेले स्ट्रॉबेरीचे पीक हे भारतात व महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी हे पीक घेण्यास सुरुवात झाली. तेथे या पिकास हवामान पोषक असल्याने तेथेच याचे उत्पादन मिळते असा सर्वांना समज होता. मात्र उदगीर सारख्या ठिकाणी सुद्धा स्ट्रॉबेरीचे पीक घेता येते. हे या प्रयोगातून सिद्ध झाले असून स्ट्रॉबेरीची शेती भविष्यामध्ये उदगीर परिसरातही सुरू होणार असे या प्रयोगावरून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

प्रवीणकुमार शिवाजीराव गवळी व मीनाक्षी प्रवीणकुमार गवळी या दांपत्याने त्यांच्या शेतातील ३२ गुंठे पॉलिहाऊस मध्ये सेंद्रिय पद्धतीच्या स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला असून, या स्ट्रॉबेरीच्या झाडापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. ही स्ट्रॉबेरी सेंद्रिय असल्याने या स्ट्रॉबेरीला चारशे रुपये प्रति किलो दराने मागणी आहे. हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याने या स्ट्रॉबेरीला पाहण्यासाठी अनेक शेतकरी भेट देऊन पाहणी करत आहेत.

३२ गुंठे क्षेत्रामध्ये दोन प्रजातीच्या वीस हजार रोपांची लागवड केली आहे. लागवड केल्यापासून अडीच महिन्यानंतर या पिकाच्या उत्पादनात सुरुवात होते. या पिकास कसल्याच पद्धतीच्या रासायनिक खतांचा व औषधांचा वापर करण्यात आला नसून पूर्णपणे सेंद्रिय खते व औषधांचा वापर करण्यात आला आहे.

वीस हजार रोपांसाठी अडीच लाख रुपयाचा खर्च आला असून सेंद्रिय खते व औषधांसाठी आणि मशागतीसाठी जवळपास पन्नास हजार रुपयांचा खर्च आला आहे. असा जवळपास एकूण तीन लाख रुपयांचा खर्च आला असून आता स्ट्रॉबेरी फळांची विक्री सुरू झाली आहे.

या एकूण स्ट्रॉबेरी पिकापासून दीड ते दोन टन उत्पादन अपेक्षित असून जवळपास सहा ते आठ लाख रुपयाचे उत्पादन अपेक्षित असुन, तीन लाख खर्च वजा जाता चार ते सहा लाख रुपयाचा निव्वळ फायदा अपेक्षित असल्याची माहिती श्री गवळी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया

विना पॉलिहाऊस स्ट्रॉबेरीचे उत्पादन शक्य

स्ट्रॉबेरी पिकाची लागवड पॉलिहाऊसच पाहिजे असे नसून विना पॉलिहाऊस व मोकळ्या शेत जमिनीमध्ये सुद्धा स्ट्रॉबेरीचे पीक घेता येते. मात्र थंडीचे वातावरण या पिकास आवश्यक आहे जेवढी थंडी जास्त तेवढे या पिकास फायदा मिळतो विशेषता स्ट्रॉबेरी पिकाच्या फळधारणेच्या वेळेस थंडी असणे अत्यावश्यक असून, जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी थंडीच्या मोसमातच या पिकाची लागवड करणे योग्य आहे अशी माहिती प्रवीणकुमार गवळी यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com