कार्तिकी एकादशीला रेल्वेची ‘पंढरीवारी’ | Udgir | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१४ नोव्हेंबरला बिदर- पंढरपूर रेल्वेची सोय
कार्तिकी एकादशीला रेल्वेची पंढरीवारी

उदगीर : कार्तिकी एकादशीला रेल्वेची पंढरीवारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उदगीर : अनेक वर्षांची धार्मिक परंपरा असलेली कार्तिकी एकादशीची वारी कोरोनाच्या कारणामुळे गेल्या दोन वर्षांपासून खंडित झाली होती. यावर्षी शासनाने या वारीला परवानगी दिल्यामुळे पंढरीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रवासासाठी दक्षिण मध्य रेल्वेने सोय केली आहे. रविवारी (ता.१४) बिदर ते पंढरपूर रेल्वे धावणार असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली.

हेही वाचा: पुन्हा अमित देशमुख यांचा स्वबळाचा नारा

पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनासाठी कार्तिकी एकादशीला लाखो भाविक जात असतात. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही वारी गेल्या दोन वर्षांपासून खंडित झाली होती. यावर्षी शासनाने या वारीला परवानगी दिल्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी. कर्मचाऱ्यांच्या चालू असलेल्या संपामुळे एसटीची सेवा बंद असल्याने पंढरीच्या दर्शनासाठी जायचे कसे?

हा प्रश्न वारकऱ्यांसमोर उभा होता. ही अडचण लक्षात घेऊन उदगीर रेल्वे संघर्ष समितीने केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या माध्यमातून दक्षिण मध्य रेल्वेकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून, दक्षिण मध्य रेल्वेने खास वारकऱ्यांच्या सोयीसाठी बिदर- पंढरपूर ही रेल्वे १४ नोव्हेंबर रोजी धावणार असल्याचे जाहीर केले आहे. ही रेल्वे १४ नोव्हेंबर रोजी बिदर येथून रात्री १० :३० वाजता निघणार असून, भालकी, कमलनगर, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद मार्गे पंढरपूरला १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता पोहोचणार आहे.

हेही वाचा: वर्धा : सव्वालाख हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

तर परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर येथून १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता निघून त्याच मार्गाने बिदरला १५ रोजी पहाटे ५ वाजता पोहोचणार आहे. या रेल्वेचा वारकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करून ही रेल्वे विना आरक्षित असून, रेल्वे स्थानकात सामान्य दरातील तिकीट उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली.

loading image
go to top