सव्वालाख हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली | Wardha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्धा : सव्वालाख हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

वर्धा : सव्वालाख हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : कृषी उत्पादनासाठी सिंचन आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन-तीन पिके घेता यावी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न केले जाते. वर्ध्यात एक लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात येईल.

जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिल्यास कृषी उत्पादन वाढून शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे सर्व प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या सिंचन योग्य पाण्याचे नियोजन करून जास्तीत जास्त शेती ओलिताखाली आण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा: नागपूर : छोटे उद्योग अडचणीत

या आराखड्याप्रमाणे जिल्ह्यात एक लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष सिंचनाखाली येईल. सिंचन आराखड्याप्रमाणे तालुकानिहाय सिंचनाखाली येणाऱ्या क्षेत्रात वर्धा तालुका १६ हजार ५७१ हेक्टर, सेलू २० हजार ५८० हेक्टर, देवळी ३३ हजार ९९७ हेक्टर, आर्वी १४ हजार ७८२ हेक्टर, आष्टी नऊ हजार ५१६ हेक्टर, कारंजा तीन हजार २८ हेक्टर, हिंगणघाट सात हजार ९८० हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यात आठ हजार ८३ हेक्टर प्रत्यक्ष सिंचनाखाली येईल. जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघु प्रकल्प तसेच लघु पाटबंधारे योजना, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, सिमेंटनाला बांधकाम या सर्व प्रकल्पाची उपलब्ध सिंचन क्षमता ओलितासाठी वापरण्यात येणार आहे.

loading image
go to top