Udgir News : उदगीरात दोन हजाराची लाच घेताना तलाठी जाळ्यात; उपजिल्हाधिकारी कार्यालयातील घटना

ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू
udgir talathi caught taking 2000 bribe crime marathi news acb
udgir talathi caught taking 2000 bribe crime marathi news acb esakal

उदगीर: उपविभागीयआधिकारी कार्यालयातील प्रतिनियुक्तीवर असलेले तलाठी उमेश प्रकाश तोडकरी (४२ ) याला बुधवारी (ता.२७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पंचा पथकाने २ हजार रुपयाची लाज घेतातना पंचायत समक्ष रंगेहात पकडण्यात आले.

याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत थोडक्यात माहिती अशी की उ तालुक्यातील हणमंतवाडी ( देवर्जन ) ता.उदगीर येथील तक्रारदाराच्या काकुच्या नावे शेतात असलेल्या पाझर तलावासाठी संपादित जमिनीचा मावेजाची रक्कम खात्यावर जमा केल्याचा मोबदला व पुढील अधिकचा मावेजा मिळण्याकरिता अपिलाच्या फाईल मध्ये त्रुटी न काढता पाठवण्यासाठी मदत व मार्गदर्शन करतो

म्हणून आरोपी उमेश प्रकाश तोडकरी (४२ ) रा . गोल्डनवुड्स सोसायटी देगलूर रोड , उदगीर याने तक्रारदारा कडून दोन हजार रुपयेची लाच पंचा समक्ष स्वीकारल्याने त्याला जागीच रंगेहाथ पकडण्यात आले .याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती . लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्या पथकाने ही कारवाई केली .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com