esakal | उमरग्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या बाराशेवर; ८०८ रुग्णांची कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

उमरगा शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग वाढतच चालला आहे. दोन महिने उलटले तरी पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी होत नाही. चार दिवसात १५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आत्तापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने बाराशेचा टप्पा पूर्ण करुन तो एक हजार २०७ झाला आहे. 

उमरग्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या बाराशेवर; ८०८ रुग्णांची कोरोनावर मात

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग वाढतच चालला आहे. दोन महिने उलटले तरी पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी होत नाही. चार दिवसात १५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आत्तापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने बाराशेचा टप्पा पूर्ण करुन तो एक हजार २०७ झाला आहे. 

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

कोरोना विषाणू संसर्ग वाढत चालल्याने चिंतेचे वातावरण आहे. संसर्ग वाढीचा दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होऊन आठवडा होत आला ; तरीही संसर्गाचा वेग कमी होत नाही. एक सप्टेंबर पासुन चार चार दिवसाच्या अहवालात १५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकुण रुग्णसंख्या एक हजार २०७ झाली आहे. त्यात शहरातील ६११ तर ग्रामीणमध्ये ५९६ रूग्ण झाले आहेत. दरम्यान शुक्रवारी (ता.चार) अन्टीजेनमध्ये ग्रामीण भागातील पेठसांगवीत आठ, आलूर एक, मुरुम एक, औराद दोन, गुंजोटी एक, येणेगुर एक, कासारशिर्सी एक, कर्नाटकातील गढीगौडगांव एक असे १६ पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत तर गुरुवारी पाठविलेल्या ५१ स्वॅब पैकी २१ पॉझिटिव्ह आले आहेत त्यात शहरात पाच, ग्रामीणमध्ये सोळा रूग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत पॉझिटिव्हमुळे मृत्यू झालेली संख्या ३५ वर पोहचली आहे. 

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन   

ग्रामीण भागात वाढतोय संसर्ग !
दोन महिन्यात शहरात संसर्ग वेगात होता मात्र गेल्या पंधरा दिवसात मुरूम शहरासह ग्रामीण भागात संसर्ग वाढल्याने रूग्णसंख्याही वाढली आहे. येत्या चार दोन दिवसात शहरी भागात आकडा ग्रामीण भाग ओलांडेल असे चित्र दिसत आहे.

८०८ जण झाले कोरोनामूक्त !
रुग्ण संख्येचा आलेख वाढतच असल्याने प्रशासनाने उपचारासाठी सरकारी कोविड रुग्णालयासह खाजगी कोविड रुग्णालय सुरू केले. त्याशिवाय उपचारासाठी शहरातील इदगाह कोविड सेंटर व मुरुम येथील कोविड सेंटरमध्ये सोय करण्यात आली आहे. होम आयसुलेशनमध्ये राहुन अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. दोन महिन्यात ८०८ जणांनी कोरोनावर मात केली असून ३६४ जणावर उपचार सुरू आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image