Gram Panchayat Election: उमरगामध्ये ४९ ग्रामपंचायतीसाठी पहिल्या दिवशी १६९ नामनिर्देशन पत्रांची विक्री

अविनाश काळे
Thursday, 24 December 2020

तालुक्यातील ४५३ वार्डांची निवडणूक होत असून त्यासाठी ९० हजार ७८१ मतदार  मतदार संख्या आहे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी बुधवारपासून (ता. २३) नामनिर्देशनपत्राची विक्री व स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी १६९ नामनिर्देशनपत्राची विक्री झाली असून एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. दरम्यान तालुक्यातील ४५३ वार्डांची निवडणूक होत असून त्यासाठी ९० हजार ७८१ मतदार  मतदार संख्या आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या फडात उतरण्यासाठी सर्वच पक्ष, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. बहुतांश गावात महाविकास आघाडीच्या फॉर्मुल्याचे गणित पक्के करण्याचा प्रयत्न सुरू आहेत मात्र त्यात बऱ्याच अडचणी येताना दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षविरहित आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Gram Panchayat Election: उदगीर तालुक्यात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

आरक्षित वार्डासाठी सक्रियपणे काम करणाऱ्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्याचे काम सुरू असताना दिसत आहेत. तसेच एका पेक्षा दोन अथवा तीन पर्यायी उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र भरण्याच्या हालचाली सुरु आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार कोणता असेल यावरून दोन्ही आघाडीत उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत धाकधूक राहणार आहे. 

जालना जिल्ह्यात नाफेडचे खरेदी केंद्र बंद होण्यास सुरवात, खुल्या मार्केटमध्ये अधिक भाव

दरम्यान निवडणूक विभागाने तहसील कार्यालयाच्या नवीन धान्य गोडाऊनमध्ये निवडणूक कार्यालय सुरू केले आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ स्वंतत्र टेबल ठेवण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, नायब तहसीलदार विलास तरंगे, एन.आर. मल्लूरवार निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी काम पाहत आहेत.

ग्रामपंचायत ४९
प्रभाग संख्या १७१
मतदान केंद्र १७१
सहाय्यकारी मतदान केंद्र ३२
निवडणूक निर्णय अधिकारी २३
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी २३
एकूण सदस्य संख्या ४५३ 
एकूण मतदारसंख्या ९० हजार ७८१
पुरुष मतदारसंख्या ४८ हजार १२७
स्त्री मतदारसंख्या ४२ हजार ६५३
इतर (तृतीयपंथी) एक

 

 

(edited by- pramod sarawale)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umarga Gram Panchayat Election 169 nomination forms sold