esakal | Gram Panchayat Election: उदगीर तालुक्यात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat

बीड तालुक्यातील निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून नामनिर्देशन पत्र स्विकृती साठी ग्रामपंचायत निहाय निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Gram Panchayat Election: उदगीर तालुक्यात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : तालुक्यातील एकसष्ठ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. बुधवार (ता.23) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असताना पहिल्या दिवशी तालुक्यातील एकाही गावच्या इच्छुकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याची माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली आहे.

बीड तालुक्यातील निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून नामनिर्देशन पत्र स्विकृती साठी ग्रामपंचायत निहाय निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

जालना जिल्ह्यात नाफेडचे खरेदी केंद्र बंद होण्यास सुरवात, खुल्या मार्केटमध्ये अधिक भाव

वाढवणा (बु), अडोळवाडी यशपाल सातपुते, हसनाळ इस मालपुर एकुरगा रोड संतोष चोपडे, करडखेल, करवंदी, कासरा शिवशंकर पाटील, करखेली, वाढवणा (बु), गुरदाळ वेंकटेश दंडे, किनी यल्लादेवी, जानापूर कुमदाळ (हेर) संभाजी चव्हाण, कुमठा, जकनाळ, टाकळी विजय आजने, कौळळख, खेरडा, गंगापूर रवींद्र जाधव, गुडसूर, आवलकोंडा विकास सूर्यवंशी, चिगळी, लोणी, कुमदाळ (उदगीर) राहुल सूर्यवंशी, चांदेगाव, डांगेवाडी, डाऊळ हिप्परगा राम कुलकर्णी, डोंगरशेळकी, तादलापूर, दावणगाव संजयकुमार पाटील, धडकनाळ, धोंडीहिप्पर्गा, लिंबगाव चिंतामणी कोकरे, नळगीर, कोदळी उत्तम केंद्रे, निडेबन, पिंपरी फारुख मोहम्मद, सुमठाणा, बामणी, हकनकवाडी राघोबा घंटेवाड, बेलसक्करगा, बोरगाव, भाकसखेडा निळकंठ पवार, मल्लापुर, मांजरी, मादलापुर संदीप ठेंगे, माळेवाडी, येनकी, वागदरी नितीन लोहकरे, लोहारा क्षेत्रफळ विवेकानंद स्वामी शिरोळ जानापुर (जा), हिप्परगा (डावुळ) सुधाकर आवंडकर, हंगरगा हंडरगुळी बालाजी धमनसुरे हाळी, रुद्रवाडी महादेव वाघमारे, हेर होनीहिपरगा, संजय गुजलवार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर धनंजय कुलकर्णी, वैजनाथ शिंदीकुमठे, ज्ञानेश्वर कानवटे याची राखीव निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी प्रथमच ऑनलाइन नामनिर्देशनपत्र भरावे लागणार असून त्याची प्रिंट ही निवडणूक निर्णय अधिकारी याकडे दाखल करावी लागणार आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज विकत घेण्याची आवश्यकता राहिली नाही. ऑनलाइनवर भरलेला उमेदवारी अर्ज आणि डिपॉझिट सादर करावे लागणार आहे राखीव असेल तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जातीचे प्रमाणपत्र व एक वर्षात जात पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे स्वयंघोषणापत्र दाखल करणे बंधनकारक आहे.

परळीमध्ये कुलर उत्पादन कारखान्याला आग; लाखोंचं नुकसान

पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी एकाही उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून निवडणूक निर्णय अधिकारी याकडे दाखल केला नाही बहुतांश उमेदवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करत असताना दिसून येत आहेत.

(edited by- pramod sarawale)

loading image