esakal | उमरग्याच्या नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे बडतर्फ
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेमलता टोपगे

उमरग्याच्या नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे बडतर्फ

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : पालिकेच्या कामातील अनियमितता, लाखो रुपयाचा गैरव्यवहार, विहीत प्रक्रीयाचा अवलंब न करणे आदी मुद्दावर नगरविकास खात्याने गुरूवारी (ता.नऊ) उमरगा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना नगराध्यक्षापदावरून  अपात्र ठरवून, सहा वर्षे निवडणूक लढविण्यास प्रतिबंधीत केले आहे. दरम्यान नगराध्यक्षाच्या कालावधीतील गैरव्यवहाराच्या प्रकरणात असलेल्या मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्याविरूध्द जिल्हाधिकारी यांनी विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे आदेश नगरविकास मंत्रालयाने काढले आहेत.

हेही वाचा: महिलांसाठी 'सुगरण' योजना आनंददायी; पाहा व्हिडिओ

उमरगा पालिकेत काँग्रेसच्या नगराध्यक्षा आहेत, बहुमतासाठी भाजपा सत्तेत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षा सौ. टोपगे यांच्या अनियमिततेच्या अनेक प्रकरणात गेल्या दोन -अडीच वर्षापासुन जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल होत्या, शिवाय माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार यांनी हे   प्रकरण उच्च न्यायालयात सुद्धा दाखल केले होते. अनेक भ्रष्टाचार प्रकरणात, मनमानी कारभार बाबत राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने दोन महिन्यापूर्वी नगराध्यक्षाना निलंबित का करू नये अशी नोटीस बजावली होती. त्यासंदर्भात अंतिम सुनावणीसाठी नगरविकास खात्याने, नगराध्यक्षासह तक्रारदार असलेल्या शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँगेसच्या पंधरा नगरसेवकांना आपले अंतिम म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली होती.

हेही वाचा: जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे २४५ कोटींचे नुकसान

१७ ऑगस्ट २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीडीओ कॉन्स्फरिंगद्वारे नगरविकास विभागाने नगराध्यक्षासह पंधरा नगरसेवकांचे म्हणने घेतले होते. या प्रकरणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच चौकशी अहवालह महत्वपूर्ण ठरला. दरम्यान गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्षा टोपगे लोकसेवक म्हणून कार्य करीत असताना गैरवर्तन, अनियमितता व कर्त्यव्यात कसूर केलेली असल्याने, नगराध्यक्षा पदावरून अपात्र ठरवित, पुढील सहा वर्षेसाठी निवडणूक लढविण्यास प्रतिबंध घातला आहे, तर गैरव्यवहाराच्या कालावधीतील तत्कालिन मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांचीही विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत, या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Latur : औशात भरधाव टिप्परने बालिकेला चिरडले

"नगर परिषदेच्या कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार प्रकरणी प्रत्येक स्तरावर तक्रारी दाखल करून न्याय मागणी केली होती. त्याप्रमाणे कारवाई झालेली आहे. शहरातील कर रूपाने जमा झालेल्या रक्कमेच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झालेली आहे. जनतेचा पैसा वसुल झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही."

- रजाक अत्तार, माजी नगराध्यक्ष

"पालिकेत विकास कामे करताना विश्वासात घेत असतानाही विरोधी सदस्यांनी नाहक त्रास दिला. महिला म्हणुन अनेक कामात अडथळे आणले गेले ; तरीही शहराच्या विकास कामात खंड पडू दिला नाही. हा निर्णय राजकीय सुडबुद्धितुन झालेला आहे. या निर्णयाच्या विरोधात औरंगाबाद खंडपिठात दाद मागणार आहे. पालिकेत जमा असलेल्या शासकिय रक्कमेच्या अपहारात कांही विरोधी सदस्यांचा सहभाग असल्याने याबाबत वरिष्ठांकडे तक्रार दिली आहे. जनतेने मला निवडून दिले आहे, न्यायालयाकडून मला दाद मिळेल आणि पुन्हा लोकांच्या सेवेत येईन."

- सौ. प्रेमलता टोपगे

loading image
go to top