
उमरगा पोलिसांची धडक कारवाई, वाहनांसह २७ लाखांचा गुटखा पकडला
उमरगा (जि.उस्मानाबाद) : महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. उमरगा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन राष्ट्रीय महामार्गावर तलमोड टोलनाक्यावर पोलिसांनी सापळा लावुन बेकायदा गुटखा वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोवर कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे २२ लाख ५० हजार रुपये किमतीचा गुटखा व सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आले. आयशर टेम्पो किंमत अंदाजे पाच लाख रुपये असा एकुण २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात (Osmanabad) घेतला आहे. याबाबतची माहिती अशी की, जिल्हा पोलिस अधीक्षक निवा जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते व पोलिस निरीक्षक इकबाल सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलीस नाईक चंद्रकांत गायकवाड, अतुल जाधव, लक्ष्मण शिंदे, सिध्देश्वर उंबरे बाबा कांबळे आदींच्या पथकाने तलमोड (Umarga Police) टोलनाक्यावर सापळा रचला. (Umarga Police Seized Along WIth 27 Lakh Rupees Osmanabad)
हेही वाचा: भाजपला फक्त १ हजार रुपये द्या, नितीन गडकरींचं नागरिकांना आवाहन
शुक्रवारी दुपारी तीनच्या दरम्यान आयशर टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात आर. के. या नावाचा गुटखा असलेली ४५ पोती आढळून आली. वाहन चालक लक्ष्मण रोहादास राऊत (वय २७, रा.अनाळा ता. परंडा ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गुटख्याची मोजमाप व तपासणी करण्यात आली आहे. अन्न भेसळ विभागाला याबाबत कल्पना देण्यात आली असून त्यांच्या पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक इकबाल सय्यद यांनी दिली.
Web Title: Umarga Police Seized Along With 27 Lakh Rupees Osmanabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..