esakal | Osmanabad Rain: उमरगा ‘तहसील’च्या तळमजल्यात पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

उमरगा.

रविवारी (ता. पाच) रात्री झालेल्या पावसानेही पाणी साचले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास होत असून, पुरवठा विभाग, विशेष साहाय्य योजना आणि अभिलेख कक्षाचे काम सोमवारी (ता. सहा) ठप्प होते

Osmanabad Rain: उमरगा ‘तहसील’च्या तळमजल्यात पाणी

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): येथे चार वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाची इमारत बांधली. पण, मुसळधार पाऊस झाल्यास या इमारतीच्या तळमजल्यात पाणी साचत आहे. रविवारी (ता. पाच) रात्री झालेल्या पावसानेही पाणी साचले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास होत असून, पुरवठा विभाग, विशेष साहाय्य योजना आणि अभिलेख कक्षाचे काम सोमवारी (ता. सहा) ठप्प होते. इमारतीच्या बांधकामापासून दर पावसाळ्यात तळमजल्यात पाणी साचते. दरम्यान, इमारतीचे काम सुरू करण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, संबंधित ठेकेदार यांना भविष्यात घडणाऱ्या अशा प्रकाराची बाब लक्षात कशी आली नाही, हा मूळ मुद्दा आहे. तहसील कार्यालयाचा पत्रव्यवहार होतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी करतात. मात्र, त्यावर पर्यायी उपाययोजनांची अंमलबजावणी होत जात नाही.

इमारतीच्या बाजूने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला दुसरीकडे वाटच नाही, अशी स्थिती असताना इमारतीची रचनाच कशी केली गेली. वास्तविकता तळमजला पार्किंगसाठी उपयुक्त झाला असता. मात्र, नेमके कुणाच्या कल्पनेतून तळमजल्यात कार्यालये केली, याबाबत चर्चा होते आहे. प्रत्येक वेळी नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार यांच्याकडून पर्यायी उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला जातो. मात्र, त्यावर काहीही तोडगा निघत नाही. त्याचा परिणाम कामावर होत आहे.

हेही वाचा: Heavy Rain: भूम तालुक्यात पीक, रस्त्यांचे नुकसान!

सेतू केंद्राची जागा बदलली-
तळमजल्यात दरवर्षी किमान पंधरा ते महिनाभर पाणी साचत असल्याने कंटाळून सेतू सुविधा केंद्र राष्ट्रीय महामार्गालगत खासगी जागेत सुरू आहे. निवडणूक विभाग दोन वर्षांपासून वरच्या मजल्यावर स्थलांतर करण्यात आले आहे. आता सध्या कार्यरत असणारे संजय गांधी निराधार योजना, अभिलेख विभाग, पुरवठा विभाग पाण्याखाली आहे. येथील साहित्य वरच्या मजल्यावर ठेवण्याचे काम कर्मचारी करीत होते. या संदर्भात प्रभारी तहसीलदार एन. आर. मल्लुरवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे.

तहसील कार्यालयाच्या तळमजल्यात पाणी साचण्याचा प्रकार बंद होण्यासाठी नाला बांधकामासह तत्सम कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठविले आहे. मात्र, अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
- संजय विभूते, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

loading image
go to top