आरटीईअंतर्गत १२२ विद्यार्थ्यांचे प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Umarga RTE Admission of 122 students

आरटीईअंतर्गत १२२ विद्यार्थ्यांचे प्रवेश

उमरगा : २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी तालुक्यातील नोंदणीकृत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या १७ तर मराठी माध्यमाच्या एक अशा १८ विना अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली वर्गासाठी १६३ प्रवेशाच्या जागा राखीव होत्या. मात्र तीन शाळासाठी एकही अर्ज नसल्याने लॉटरी पद्धतीने उर्वरीत शाळांसाठी १५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश पात्र करण्यात आले होते. त्यापैकी मंगळवारी अखेरच्या दिवशी १२२ प्रवेश निश्चित झाले आहेत.

शाळानिहाय निश्चित झालेली प्रवेश संख्या

शायनिंग स्टार इंग्लिश स्कूल दाळिंब -पाच, संजीवनी मॉडर्न इंग्शिल स्कूल एकोंडी जहागीर -दहा, डॉ.एचबीके इंग्लिश स्कूल उमरगा - एक, फिनिक्स इंग्लिश स्कूल गुंजोटी - चार, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल मुरुम - दहा, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल तुरोरी - आठ, रायझिंग सन इंग्लिश स्कूल उमरगा - दोन, श्री. श्री. रविशंकर मराठी प्राथमिक शाळा उमरगा - दोन, डॉ. के. डी. शेंडगे इंग्लिश स्कूल उमरगा -१८ माऊली इंटरनॅशनल स्कूल उमरगा - दोन, श्री श्री रविशंकर इंग्लिश स्कूल, -तीन ओरियन इंग्लिश स्कूल, उमरगा - ११, डॉ. कुशाबा धोंडिबा शेंडगे सीबीएसई स्कूल उमरगा -आठ, लोटस पोद्दार इंग्लिश स्कूल, उमरगा - १३, हायटेक इंग्लिश स्कूल, येणेगुर-१९.

दरम्यान छत्रपती शिवाजी इंग्लिश स्कूल बलसूर येथे एक, समृध्दी इंग्शिल स्कूल चिंचोली भुयार येथे एक व इंदिरा इंग्लिश स्कूल कुन्हाळी येथे चार जागा असतानाही पालकांनी ऑनलाईन मागणी अर्जातच प्रवेशाची मागणी केलेली नाही. दरम्यान प्रस्तावाची पडताळणी गट शिक्षण अधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी केल्यानंतर १२२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. उर्वरीत ४२ प्रवेशाची संधी आता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात दिली जाणार आहे.

‘देणगी’ ची मागणी कशासाठी?

आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश असताना काही मोजक्या नामवंत शाळेत पाल्यांना दहा हजार रुपये देणगीची मागणी केली जात असल्याची चर्चा सुरू आहे. अपवादात्मक शाळेत असा प्रकार नाही. वास्तविकता : इंग्रजी शाळेचे आकर्षण मुलांच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे असते अशी मानसिकता पालकांची झालेली आहे. पण गरीब कुटुंबातील पाल्यांना आरटीई अंतर्गत ‘ट्युशन फी’ माफ आहे. इतर खर्च पालकांना द्यावा लागतोच. त्यात देणगीची मागणी कशासाठी असा सवाल उपस्थित केला जातोय. या संदर्भात गट शिक्षणाधिकारी श्री. बिराजदार यांनी काही पालकांच्या तोंडी तक्रारी आल्याचे सांगितले. लेखी तक्रारी प्राप्त झाल्या तर संबंधित शाळेला जाब विचारता येईल. असे ते म्हणाले.

Web Title: Umarga Rte Admission Of 122 Students Second Stage For 42 Admission

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top