​Dharashiv: महावितरणच्या कारभाराविरोधात उमरग्यात काँग्रेसचा भव्य 'रास्ता रोको'; ​पीक विमा, पेपरफुटी, स्मार्ट मीटर व सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ एल्गार; संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा

Congress Holds Massive Road Blockade in Umerga: उमरगा रस्ता रोको आंदोलनात महावितरणच्या कारभाराविरोधात काँग्रेसने तीव्र आंदोलन करत शेतकरी, स्मार्ट मीटर आणि पीक विम्याच्या प्रश्नांवर आवाज उठवला.
​Dharashiv

​Dharashiv

esakal

Updated on

अविनाश काळे

उमरगा, (जि. धाराशिव):महावितरणच्या बेजबाबदार कारभाराविरोधात, शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रश्नावर, 'नीट' व 'टीईटी' पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या वतीने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषद सदस्या लता मोरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता.२१) उमरग्यात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडनेही जाहीर पाठिंबा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com