esakal | अन् चिकन विक्रेत्याचे २९ हजार मिळाले परत
sakal

बोलून बातमी शोधा

CYBER CRIME

अन् चिकन विक्रेत्याचे २९ हजार मिळाले परत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाचोड : फौजी असल्याची बतावणी करून १४० लो चिकन घ्यावयाचे असल्याचे आमिष दाखवून एका भामट्याने गुरुवारी (ता.१९ ऑगस्ट) चिकन विक्रेत्यास २९ हजार रुपयाला ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार पाचोड (ता.पैठण) येथे घडला होता. या घटनेची दखल घेत सायबर क्राईमच्या पोलिसांनी चिकन विक्रेत्याचे पैसे आठ दिवसांत परत मिळवून दिले. आपले पैसे परत मिळाल्याने चिकन विक्रेत्याने सायबर क्राईम सेलच्या पोलिसांचे पुष्पहार देऊन अभिनंदन केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोड (ता.पैठण) येथील चिकन विक्रेते मोबीन रहेमान कुरेशी (वय ३१) यांना ता.१९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान एका अनोळखी नंबरवरुन फोन आला. मी एक फौजी बोलत असून मला १४० किलो चिकन विकत घ्यायचे आहे. काय दराने देणार आहे अन् १४० किलोचे किती रुपये होतात, ताबडतोब कळवा असे सांगून त्याने फोन ठेवला. मग चिकन विक्रेत्याने १४० प्रती किलो दराने १४० किलोचे २५ हजार २०० रुपये होत असल्याचे फोन करून सांगितले. तोच समोरील व्यक्तीने सर्व पैसे देण्याचे सांगून मी या चिकनचे पैसे तुमच्या फोन-पे पाठवितो असे सांगून मी तुमच्या खात्यावर एक रुपया सेंड करतो असे सांगून एक रुपया पाठविला. आपण पाठविलेला एक रुपया आल्याची खात्री पटवण्यासाठी भामट्याने परत चिकन विक्रेत्याला फोन करुन विचारले. तेव्हा चिकनवाल्याने हो सर आपणास एक रुपया आल्याचे सांगितले.

हेही वाचा: अपघात झाला अन् वाहने सोडून फरार झाले

यानंतर मग विश्वास संपादन करुन त्याने मी २९ हजार रुपये तुमच्या खात्यावर पाठवतो असे म्हणून त्या फौजीने २९ हजाराचा मेसेज चिकन शॉप विक्रेत्याला पाठवला आणि त्या मेसेजला एक वेळेस टच करण्याचे सांगितले, तोच याच चिकन शॉपवरती आलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीचा फोन पे नंबर ही मागून त्या नंबर वरती १० हजार पाठवतो, असे सांगून त्या व्यक्तीलाही एक रुपया टाकला तो आला की नाही याची विचारणा केली आणि त्या व्यक्तीच्या नावावरही १० हजार रुपये पाठवल्याचे सांगितले. या दोन्ही मेसेजला एक वेळेस टच करा असे सांगितले

चिकन शॉप विक्रेत्याने दोन्ही मोबाईलवरील मेसेजला एक वेळेस स्पर्श केल्याबरोबरच काही मिनिटातच चिकन शॉप चालकाच्या खात्यावरील २९००० रुपये डेबिट झाले तसेच जो ग्राहक चिकन घेण्यासाठी आला होता. त्याच्या ही खात्यावर दहा हजाराचा मेसेज पाठवण्यात आला होता. त्या मेसेजला ही स्पर्श करताच त्याच्या खात्यावरील ही दहा हजार रुपये या भामट्याने वळते केले.

हेही वाचा: औरंगाबाद : परिचारिकांच्या बदल्यांना स्थगिती

याबाबत चिकन विक्रेत्याने तत्काळ पाचोड पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

या घटनेचे गांभीर्य ओळखत सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी भगवान धांडे, पवन चव्हाण यांनी तातडीने सायबर क्राईम औरंगाबाद (ग्रामीण) यांच्याकडे हा गुन्हा वर्ग केला. सायबर क्राईम पोलिसांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली. अन् घडलेल्या घटनेचा बारकाईने तपास करुन आठ दिवसातच भामट्याने ऑनलाईन गंडा घालून वळती केलेल्या २९ हजार रुपयाचा तपास लावत गेलेले पैसे मोठ्या शिताफीने परत मिळविण्यात यश मिळविले. परत मिळविलेले पैसे चिकन विक्रेत्यास बुधवारी (ता.१) परत केले.

कष्टाने कमावलेले पैसे गेल्यानंतर ते परत मिळाल्याचे आनंद व्यक्त करत चिकन विक्रेत्याने सायबर क्राईम सेलचे पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलिस कर्मचारी कैलास कामठे, संदीप वरपे, रवी लोखंडे, नितीन जाधव, योगेश मोईम, योगेश दारूंटे, मुकेश वाघ, गजानन बनसोड यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत तसेच त्यांचे धन्यवाद मानले.

loading image
go to top