esakal | क्रिकेटच्या मैदानावरील अनोखे किस्से, कोणते? ते वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

‘द वॉल’ राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत भारताच्या अंडर-१९ संघाने विश्‍वकप जिंकण्याचा बहुमान मिळविला आहे. अशा वऱ्हाडचा ‘बाप्पू’ राहुल द्रविडच्या खेळाला सलाम.

क्रिकेटच्या मैदानावरील अनोखे किस्से, कोणते? ते वाचाच

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : जगात मोठ्या प्रमाणावर खेळला जात असलेला क्रिकेट खेळ विविध कारणांनी व विक्रमांनी गाजत असतो. क्रिकेटच्या मैदानावर त्याचे अनेक आश्‍चर्यकारक व विस्मयकारक कारनामे सतत घडत असतात. अशा अनोख्या किस्स्यांनी क्रिडाविश्‍वात चर्चेला उधाण येते. अनेक घडना दर्घकाळ क्रिकेट व क्रीडा रसिकांच्या स्मरणात ताज्या राहतात. आज अशाच काही क्रिकेट खेळाच्या मैदानावरील अनोखे किस्से आपण जाणून घेऊयात.

सर्वप्रथम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविषयी
सचिन तेंडूलकरने २०० कसोटी सामन्यांमध्ये ५३.७८च्या सरासरीने धावा काढल्यात. तर त्याचा बालमित्र विनोद कांबळीने अवघ्या १७ सामन्यांमध्ये ५४.२०च्या सरासरीने धावा केल्यात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये ज्यामध्ये वन-डे क्रिकेट, कसोटी क्रिकेट व टी-२० क्रिकेटचा समावेश होतो. कधीही ७५ किंवा ५८ धावा केलेल्या नाहीत. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत त्याने १७ वेळा केवळ १५ धावा केलेल्या आहेत.

हेही वाचाच - ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्‍न झालेत जीवन-मरणाचे

राहुल द्रवीड
कसोटी सामन्यांत भारताच्या फलंदाजीला येणाऱ्या विदर्भाचा जावई म्हणून राहूल द्रविड हा नागपूरचा जावई आहे. तो जेव्हा नागपुरात क्रिकेटच्या स्पर्धा खेळायला येत असे तेव्हा संत्रानगरी व उपराजधानी नागपुरातल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील प्रेक्षक गॅलरीतून ‘बाप्पू’, ‘जियाजी’ असे संबोधून त्याला प्रोत्साहित केले जायचे. अनेक प्रेक्षक ‘बाप्पू खेळा’ असे म्हणत.

`बाप्पू’च्या खेळाला सलाम
राहुल द्रविडला भारतीय क्रिकेट संघाची ‘द वॉल’ म्हणजे संरक्षक भिंत असे समजले गेले आहे. खासकरून अनेक कसोटी सामन्यांमध्ये त्याने आपल्या खेळाच्या शैलीनुसार ‘ही इज द रियल वॉल आॅफ इंडियन क्रिकेट टिम’ हे सिद्ध करून दाखविले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर एक बळी भारतीय संघाचा गेलेला असताना तो तब्बल १८ वेळा वनडाऊन स्थितीत फलंदाजीला आलेला आहे. २००२ मध्ये राहुल द्रविडने कसोटी सामन्यात १३७५ धावा केल्या होत्या. गंमत म्हणजे एकाही डावात त्याने षटकार मारला नव्हता. याच ‘द वॉल’ राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत भारताच्या अंडर-१९ संघाने विश्‍वकप जिंकण्याचा बहुमान मिळविला आहे. अशा वऱ्हाडचा ‘बाप्पू’ राहुल द्रविडच्या खेळाला सलाम.

येथे क्लिक करानांदेडचे नगरसेवक देणार एक महिन्याचे मानधन

बाप बेट्याची अनोखी जोडी
दोन भावांची जोडी क्रिकेट खेळताना आपण खूप वेळा पाहिली असेल. पण बापलेकाची जोडी एकत्र खेळण्याचा योग क्वचितच किंवा खूप कमी पाहायला मिळतो. वेस्टइंडिजमध्ये झालेल्या सीडब्ल्यूआय सुपर-५० स्पर्धेत झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गयाना संघाकडून वेस्टईंडिजचा महान खेळाडू शिवनारायण चंद्रपॉल आणि त्याचा मुलगा तेजनारायण चंद्रपॉल ही जोडी खेळली. याच सामन्यात बापाने चेंडूला मारलेल्या एका फटक्यावर धावा घेताना मुलाला धावबाद केल्याने याच गोष्टीची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.  क्रिकेटमध्ये बापाने मारलेल्या एका फटक्यावर मुलगा धावबाद होण्याचा दुर्मिळ योगायोग तेव्हा बघायला मिळाला होता.

अर्जूनला अजून सूर गवसला नाही
सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर सध्या क्रिकेटमध्ये संघर्ष करतोय. एक गोलंदाज म्हणून त्याला आपली कारकीर्द घडवायची आहे. परंतु, अजूनही हवा तसा सूर न सापडल्याने तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांपासून दूरच आहे. बघुयात, केव्हा अर्जुन आपल्या वडिलांना क्रिकेटमधील पर्याय म्हणून टिपणाऱ्या धनुर्धाराप्रमाणे प्रतिस्पर्ध्यांच्या यष्टीवरील वेल्स उडवितो की नाही?

loading image