esakal | माथेफिरुने पेटविला ऊस, शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar Cane

आधी गंजी पेटविली नंतर सोयाबीनचा ढिगारा जाळला. आता त्याच शेतकऱ्याचा ऊस पेटवल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. नायगाव (ता.कळंब) येथील शेतकरी विश्वनाथ शंकर मस्के यांच्या शेतातील ऊसाची तोडणी सुरु आहे.

माथेफिरुने पेटविला ऊस, शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान

sakal_logo
By
वैभव पाटील

नायगाव (जि.उस्मानाबाद) :  आधी गंजी पेटविली नंतर सोयाबीनचा ढिगारा जाळला. आता त्याच शेतकऱ्याचा ऊस पेटवल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. नायगाव (ता.कळंब) येथील शेतकरी विश्वनाथ शंकर मस्के यांच्या शेतातील ऊसाची तोडणी सुरु आहे. अज्ञात माथेफिरू व्यक्तीने सोमवारी (ता.नऊ) रात्री ऊस पेटवून दिल्याने एक एकरावरील ऊस जळून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
नायगाव येथील विश्वनाथ मस्के यांची गट क्रमांक ४९९ मधील पाच एकरवर ऊसाची लागवड केली होती.

लातूर जिल्ह्यात सुधारित हंगामी पैसेवारी पन्नासपेक्षा जास्त, मात्र असमाधानकारक वाढ

त्या ऊसाची कारखान्यासाठी तोडणी सुरु आहे. त्यापैकी दोन एकर क्षेत्रावरील ऊसाची तोडणी पूर्ण झाली असून उर्वरित ऊसाची तोडणी सुरु आहे. सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तिने ऊस पेटवून दिल्याने एक एकरवरील ऊस जळून गेला आहे. या आधी १९ सप्टेंबरमध्ये रात्री मस्के यांनी गट क्रमांक ४९९, ५१९ मधील काढणी करुन ठेवलेल्या दोन सोयाबीनच्या गंजी पेटवून दिल्या होत्या. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन एकर क्षेत्रावरील तणनाशक फवारले होतो.   

माथेफिरुचे वारंवार कृत्य
विश्वनाथ मस्के यांच्या शेतातील जाळ पोळीचा प्रकार वारंवर सुरूच आहे. या आधी ठिबक सिंचन, कडब्याची गंज, ऊस सोयाबीनच्या गंजी अन् आता ऊस जाळला जात आहे. या कृत्याबाबत शिरढोण पोलिस ठाण्यात (ता.कळंब) रितसर गुन्हा नोंद करूनही आरोपी सापडले जात नसल्याने पोलिसच्या आरोपीला पाठीशी घालत असल्याचे बोलले जात आहे.

पंकजा मुंडे नाराज नाहीत, मी हात जोडून सांगतो! चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना केली विनंती


पंचवीस एकर क्षेत्रावरील ऊस वाचला
गट क्रमांक ४९९ मध्ये जवळपास २५ एकर क्षेत्रावर ऊसाची लागवड आहे. विश्वनाथ मस्के यांच्या ऊसाच्या क्षेत्राला लागूनच अनेक शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली आहे. मस्के यांचा ऊसाची तोडणी सुरु आहे. त्याची पाचट ओली असल्याने आगीने जास्त पेट घेतला नसल्याने इतर क्षेत्रावरील ऊस पेटला नाही.
 
पोलिस तपासाबाबत संशय
जाळपोळीच्या कृत्याबाबत नावे देऊन पोलिस ठाण्याला रितसर गुन्हा नोंद होऊनही पोलिसंना आरोपी सापडत नाहीत. उलट पोलिसच तुम्ही रोजगारी लावून शेतीचे राखन करा. अन्यथा आरोपी बाबत सबळ पुरवे द्या. त्यानंतरच आम्ही आरोपीवर कार्यवाही करु, असे बोलत असल्याचे शेतकरी विश्वनाथ मस्के यांनी सांगितले.


संपादन - गणेश पिटेकर