अज्ञात व्यक्‍तीने उपटून फेकली दोन एकरांतील कपाशी

पळाशी (ता. सोयगाव) ः येथील भगवान कऱ्हाळे यांच्या शेतातील उपटून फेकलेली कपाशी.
पळाशी (ता. सोयगाव) ः येथील भगवान कऱ्हाळे यांच्या शेतातील उपटून फेकलेली कपाशी.

बनोटी, ता. 23 (जि.औरंगाबाद) ः पळाशी (ता. सोयगाव) शेतशिवारातील दोन एकर क्षेत्रावरील कपाशी पीक अज्ञात व्यक्तीने उपटून फेकल्याची घटना शुक्रवारी (ता. 23) सकाळी उघडकीस आली.


भगवान कऱ्हाळे यांनी जून महिन्यात दोन एकर क्षेत्रात कपाशीची लागवड केली होती. पिकाची चांगली वाढ झाली. वेळोवेळी केलेली मशागत, कीटकनाशकांची फवारणी, खतांची मात्रा दिल्याने पीक जोमाने बहरले होते. दोन महिन्यांचे कपाशी पीक फूलपात्यावर आले असताना अज्ञात व्यक्‍तीने गुरुवारी रात्री दोन एकरांमधील कपाशी पीक उपटून फेकल्याने कऱ्हाळे यांचे मोठे नुकसान झाले आहे. गावात कुणाशीही वैर नसताना चार महिन्यांपूर्वी कऱ्हाळे यांचा बैल विषबाधेने दगावला, एक महिन्यापूर्वी अर्धा एकरातील कपाशीचे पीकही अज्ञात व्यक्‍तीने मोडून टाकले, तर गुरुवारी रात्री कपाशी उपटून फेकल्याने भगवान कऱ्हाळे अडचणीत सापडले आहेत.


यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी तपास करावा, तसेच प्रशासनाने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.


गेल्या तीन वर्षांपासून परिसरातील शेतकरी दुष्काळाचा सामना करत असून लागवडीचा खर्चही निघाला नसल्याने त्यांच्यावर कर्जाचा भार वाढत चालला आहे, अशा परिस्थितीत काही अज्ञाताकडून कपाशीचे पीक उपटून फेकल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com